Header Ads

Header ADS

सावदा येथील वाढीव कर आकारणी रद्द करा -माजी नगरसेवक फिरोजखान पठाण

 

Savada-here-increased-tax- levy-repeal-ex-Corporator-Firozekhan-Pathan

सावदा येथील वाढीव कर आकारणी रद्द करा -माजी नगरसेवक फिरोजखान पठाण

लेवा जगत न्यूज सावदा - नवीन मूल्याधारीकरण घरपट्टी च्या नोटीसा प्रॉपर्टी धारकांना दोन ते तीन महिन्यापूर्वी देण्यात आल्या होत्या त्याची सुनावणी मंगळवार व बुधवार या रोजी पालिकेच्या सभागृहात सुरू झाली आहे त्यावेळी सुनावणी वेळी  माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी नगर रचना विभागाचे अधिकारी दिनेश तायडे यांना निवेदन दिले. 

माजी नगरसेवक फिरोज खान हबीबुल्ला खान पठाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पालिकेने नव्याने आकारलेली घरपट्टी अवाजवी असून नियमांचे पालन झालेले नाही. अनेक मालमत्तांचे मूल्यांकन व मोजमाप चुकीच्या पद्धतीने झाले. काही करदात्यांना मुदतीत पालिकेकडून कर मागणीपत्र मिळाले नाही. त्यामुळे मुदतीत हरकत घेता आली नाही. तसेच नवीन हद्द वाढ क्षेत्रात पालिकेने कोणत्याही मुलभूत सुविधा पुरवल्या नाहीत. या भागातही अवाजवी कर आकारणी झाली. त्यामुळे संपूर्ण पालिका हद्दीतील वाढीव कर आकारणी रद्द करावी, अशी मागणी पठाण यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.