Header Ads

Header ADS

सावदा येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती जल्लोषात साजरी महादेव पिंड व सोमनाथ मंदिराचा देखावा ठरला मिरवणुकीत गावकऱ्यांचे आकर्षण

 


Savada-here-Ironman-Sardar-Vallabhbhai-Patel-birthday-celebration-of-Mahadev-pind-and- Somnath-temple-appearance-in-procession-attracts-the-villagers

सावदा येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती जल्लोषात साजरी

महादेव पिंड व सोमनाथ मंदिराचा देखावा ठरला मिरवणुकीत गावकऱ्यांचे आकर्षण




लेवाजगत न्यूज सावदा- येथे दरवर्षीप्रमाणे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी स्वामीनारायण मंदिराजवळ सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या अर्धाकृती पुतळ्याला सुशोभित करून स्वामी नारायण  मंदिराचे स्वामी माधव भंडारी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक चंद्रशेखर पाटील, विकास पाटील,जयेश पाटील,शिवदे व परिसरातील नागरिक महिला उपस्थित होत्या. विविध चौका चौकात संध्याकाळी प्रतिमा पूजन करण्यात आले.

   संध्याकाळी सरदार वल्लभ भाई पटेल उत्सव समितीच्या वतीने भंव्य दिव्य अशी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीची सुरुवात दुर्गा माता मंदिरा समोरून सोमवार गिरीमढीचे महंत कृष्णगिरी महाराज व महानुभाव मंदिराचे शास्त्री महंत सुरेश राज शास्त्री मानेकर बाबा यांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जेके भारंबे,अक्षय सरोदे,बंटी बढे, सचिन बराटे, शिवसेनेचे मनीष भंगाळे ,सुरज परदेशी, अतुल नेहते यांच्यासह सर्व समाज बांधव उपस्थित होते. मिरवणुकीत तीन ट्रॅक्टर ट्रॉलीवर सजवलेले  पहिल्या रथावर महादेव शिव भगवंताची मोठी पिंड त्याच्यामागेदुसऱ्या रथावर  सोमनाथ मंदिराचा देखावा सादर करण्यात आला होता. त्यानंतर  तिसऱ्या रथावर लोहपुरुष  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अर्धाकृती पुतळा असे हे मिरवणुकीचे आकर्षण होते. मिरवणूक दुर्गा माता मंदिरापासून  संध्याकाळी सहा वाजता सुरू होऊन दुर्गा माता चौक, महावीर चौक ,इंदिरा गांधी चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, चांदणी चौक, जुनी कन्या शाळा, गांधी चौक ,गवत बाजार ,इंगळेवाडा माळीवाडा ,रविवार पेठ ,छत्रपती शिवाजी महाराज चौक, दादा गल्ली, कॉर्नर रोड सुभाष चौक पाटीलपुरा या मार्गे मोठ्या जल्लोषात बँजोच्या तालावर तरुण व वृद्धांच्या नृत्य करीत जलोशत निघाली.

 यावेळी प्रत्येक चौकात कट आउट आणि फोटो लावून परिसरातील नागरिकांनी फोटो सुशोभित करून आपले देखावे सादर केले होते ते मिरवणुकीत जाताना प्रत्येकाचे आकर्षण ठरत होते. चौका चौकात परिसरात मिरवणुकीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे पूजन नागरिक करीत होते. असेही जल्लोषात निघालेली मिरवणूक परिसरातील तसेच गावातील नागरिकांचे आकर्षण ठरली. मिरवणूक बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा महिलांसह पुरुषांची गर्दी होती.मिरवणुकीचा समारोप साडेदहा वाजता संपन्न झाली . मिरवणूक यशस्वीतेसाठी सरदार वल्लभ भाई पटेल उत्सव समितीचे अध्यक्ष गौरव भंगाळे ,उपाध्यक्ष अजय चौधरी ,खजिनदार कौशल धांडे, सचिव अक्षय नेमाडे ,अक्षय सरोदे, अक्षय भंगाळे सौरभ नेमाडे ,निलेश खाचणे यांनी परिश्रम घेतले .या वेळी सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला मिरवणूक शांततेत पार पडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.