Header Ads

Header ADS

सावदा येथे शनिवारी लेवा पाटील समाजाचा वधू-वर परिचय मेळावा

 

Savada-Yethe-Saturday-Leva- Patil-Society-Bride-Groom- Introduction-Melava

सावदा येथे शनिवारी लेवा पाटील समाजाचा वधू-वर परिचय मेळावा

लेवाजगत न्यूज सावदा- येथे दिवाळीच्या सुटीचे औचित्य साधून सावदा येथे लेवा पाटीदार समाजातील उपवर मुला -मुलींच्या परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा ११ रोजी सकाळी ९ वाजता सावदा पालिकेच्या स्व.प्रभाकर बुला महाजन सामाजिक सभागृहात होईल. समाजातील उपवर मुला-मुलींनी व पालकांच्या मागणीनुसार होणाऱ्या मेळाव्याला उपस्थिती द्यावी, असे आवाहन लेवा शुभमंगल संस्थेने केले आहे.



सकल लेवा शुभमंगल

मुला मुलींच्या पालकांच्या कामांच्या व्यस्ततेचा विचार करून आणि विविध अडचणींमुळे विवाह करताना येणारे अडथळे दूर व्हावे व विवाह लवकर तेही योग्य वेळेत आणि योग्य जोडीदारासोबतच जुळावे.....

👉 यासाठी स्पेशल दिवाळीच्या सुट्ट्यांचे निमित्त साधून गावाकडील नोकरी, व्यवसाय , शिक्षण करणारे मुलं-मुली आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये विविध शहरांमधून सुट्यांचे गावाकडे येणाऱ्या मुला मुलींसाठी

🔖 दिनांक : - 11 नोव्हेंबर 2023*

🔖 वार : -शनिवार [ दिवाळीच्या आधीचा दिवस ]

🔖 स्थळ : - स्व. प्रभाकर बुला महाजन हॉल , बस स्टँड मागे , सावदा

कार्यक्रमाची वेळ :- सकाळी 9 ते 4

जेवणाची वेळ : - दुपारी 1 ते 1:30 त्यानंतर उर्वरित मुख्य कार्यक्रम


प्रत्येकाने स्वतः साठी संपूर्ण दिवस राखीव ठेवावा


       या दिवशी भव्य असा वधु-वर परिचय मेळावा आणि त्यामध्ये त्यांची प्रत्यक्ष भेट व्हावी यासाठी संबंधित वधु-वर आणि त्यांच्या पालकांनी मेळाव्याला येण्याचे आवाहन लेवा शुभमंगल तर्फे करण्यात आले आहे.

       सावदा हे शहर समाजाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने जळगाव , भुसावळ , यावल , चोपडा , ब-हाणपूर , हैदरपूर , डाभियाखेडा , भिकनगांव-सायखेडी , खरगोन , मलकपूर, धरणगांव , मुक्ताईनगर वरणगांव, दाताळा , मोताळा , बुलढाणा थोरगव्हाण , गाडेगाव, भुसावळ, या कोणत्याही ठिकाणाहून फक्त दीड तासात येता येते .


📱 अधिक माहितीसाठी 9420309965 यावर संपर्क करावा.

महत्वाची सूचना :-

जे स्वतः च्या विवाहा बद्दल सीरियस नसतील , ज्यांना सामाजिक कार्याची जाणीव नसेल किंवा फक्त टाईमपास करायचं आहे आशा --- बांधवांनी या कार्यक्रमाला न येऊन मोठे सहकार्य करावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.