Header Ads

Header ADS

सरदार पटेल यांची जयंती म्हणजे विभूतीपुजा.. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे

 

Sardar-Patel's-anniversary-namely-Vibhutipuja-senior-social-worker-Dr-Ravindra-Bhole


सरदार पटेल यांची जयंती म्हणजे विभूतीपुजा.. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे

लेवाजगत न्यूज श्री क्षेत्र देहू येलवडी: -भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हे हिंदुस्थानच्या राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार होते. सरदार पटेल हे ज्येष्ठ नीती तज्ञ, राजनीतिज्ञ  , विधीतज्ञ ,महान राष्ट्रभक्त व राष्ट्राच्या हितासाठी जहाल मतवादी होते. व्यक्तिगत सुखदुःखाचा विचार न करता ,मानसन्मान यांची अपेक्षा न करता व उपेक्षा सहन करत सरदार पटेल ह्यांनी स्वतंत्रता व लोकतंत्र यामध्ये भरीव कामगिरी  केली. जीवनभर त्यागमय समर्पित कार्ये करून राष्ट्राच्या भल्यासाठी स्वतःचे जीवन यज्ञमय केले. विद्वत्तेचा वापर राष्ट्राच्या हितासाठी केला. सरदार पटेल हे राष्ट्राच्या हितासाठी निरंतर कार्य करणारे महान कर्मयोगी होते. सरदार वल्लभाई पटेल  यांची जयंती म्हणजे विभूतीचे पूजन आहे असे मत ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार अपंग सेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले.  श्री क्षेत्र देहू येलवडी येथे लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन येथील लेवा पाटील समाजाने केले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार, अपंग सेवक डॉ रवींद्र भोळे ह्यांनी वरील मत प्रतिपादन केले. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की निरोगी व्यसनमुक्त राहून विकर्म,अकर्म सोडून सात्विक कर्मे करावी. भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती म्हणजे हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. अश्या महान विभूती ह्या एका विशिष्ट समाजाच्या न राहता राष्ट्राच्या बनतात.सरदार वल्लभाई पटेल हे सर्व राष्ट्रभक्तांचे ऊर्जा स्तोत्र ठरले आहेत.

          यावेळी कार्यक्रमाला श्री निना खर्चे पिंपरी चिंचवड भातृमंडळ अध्यक्ष, श्री नितीन बोंडे शिवसेनाविभाग प्रमुख, श्री पंकज पाटील अध्यक्ष सरदार पटेल प्रतिष्ठान, श्री अमोल पाटील लेवा युवा संघ, मुक्ताई प्रतिष्ठान अध्यक्ष, श्री विष्णू बोरले ज्येष्ठ आळंदी लेवा समाज नागरिक, सौ किरण ताई पाचपांडे अध्यक्ष सेवा संगिनी पिंपरी चिंचवड, प्रफुल्ल नारखेडे सामाजिक कार्यकर्ते, देहू येलवडी समाज बांधव नाना बढे मंगेश खाचने,निवास फिरके ,निना बराटे निखिल बोरले ,उमेश फिरके दिपाली नारखेडे, रजनी बोंडे, सुनीता इंगळे आदी समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

      याप्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी वक्तृत्व करणाऱ्या स्पर्धेतील मुलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया देशमुख यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.