Header Ads

Header ADS

संविधानदिनातून लोकशाही, समता, बंधुभाव ही मूल्ये अन् राष्ट्रीय एकात्मता बळकट होणे गरजेचे सावद्यातील कार्यक्रमात अनोमदर्शी तायडे यांचे प्रतिपादन

लेवाजगत न्यूज सावदा-संविधान दिन साजरा करण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला. केवळ शासकीय पातळीवर हा दिवस साजरा केला जातो. संविधान दिन हा लोकोत्सव व्हावा. शाळा, महाविद्यालयात संविधान दिन साजरा करून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करावी, असे आवाहन अनोमदर्शी तायडे यांनी केले.

संविधान 'रिस्पेक्ट टू अभियानांतर्गत जनजागृतीसाठी प्रियांबल' या 'समतापथिक संविधान प्रज्ञाशोध परीक्षा' घेण्यात आली. सावदासह रावेर, यावल तालुक्यातील ४३२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रिस्पेक्ट युथ फाउंडेशनचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे बोलत होते. या परीक्षेद्वारे भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी, भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाला आपल्या हक्क आणि अधिकारांसोबतच कर्तव्याची जाण  व्हावी या उद्देशाने दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते. यशस्वितेसाठी रिस्पेक्ट युथ फाउंडेशनचे सदस्य. योगेश  तायडे, अॅड. आनंद वाघोदे, सिद्धार्थ तायडे, पंकज बोदडे, सोनू मेढे, ईश्वर लहासे, शंकर बोदडे, अमोल वाघ, सिध्दांत तायडे, नितीन झाल्टे, चेतन लोखंडे, करण तायडे, भुषण  मेढे, प्रताप तायडे, अक्षय तायडे, अक्षय सुरवाडे, अजय तायडेगणेश मेढे, दिपक बोदडे, शुभम अढागे, ईश्वर सुरवाडे, विकास तायडे, विक्रम तायडे, आशुतोष  भाले आदिंनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.