Header Ads

Header ADS

समता फाऊंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या फॅशन शो मध्ये उदळी विद्यालयाने मिळविला प्रथम क्रमांक

 

Samata-faundeshana-tarfe-ghenyata-alelya-feshana-sow-madhye-udali-vidyalayane-milavila-prathama-kramanka

समता फाऊंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या फॅशन शो मध्ये उदळी विद्यालयाने मिळविला प्रथम क्रमांक 

लेवाजगत न्यूज सावदा-येथुन जवळच असलेच्या जनता शिक्षण मंडळ संचलित उदळी येथील एन.जी. पाटील विद्यालयात समता फाऊंडेशन मुंबई च्या वतीने समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन दि.१० रोजी करण्यात आले होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रभात रामभाऊ चौधरी होते त्यांचे सोबत प्रमुख पाहुणे म्हणुन उपध्याक्ष कुमार रामभाऊ चौधरी सचिव तुकाराम बोरोले समता फांऊडेशचे विशाल इंगोले, स्मीता कांबळे,आशा तडवी यावेळी उपस्थीत होते.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या विद्यार्थीनींनी स्वागत गिताने पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्याध्यापक वाय एल पाटील  सर्वाचे शाल श्रिफल देऊन स्वागत केले व आभार मानले.

   या शाळेला समता फाउंडेशन तर्फे विस कॉम्पुटर देण्यात आले व लॅबचे उद्याटन करण्यात आले . समाज उपयोगी कार्यक्रमात नेत्र तपासणी करण्यात आली . तसेच आयुष्य मान भारत योजनेचे ८६ कार्ड वाटप करण्यात आले त्यावेळी १२० लोकांची नोंदणी करण्यात आली होती .

   या कार्यक्रमात समता फाऊंडेशन तर्फे फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये १० शाळांनी सहभाग नोंदविला होता . त्यामध्ये एन.जी.पाटील विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकविला . दुसरा क्रमांक महात्मा गांधी विद्यालय वरणगांव तर तृतिय क्रमांक सर्वोदय विद्यालय किन्ही येथील शाळांना मिळाला . कार्यक्रमाचे सुत्र संचनन रेखा तडवी यांनी केले तर आभार वाय. एल. पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.