Header Ads

Header ADS

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात अशासकीय पदभरती

 

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात अशासकीय पदभरती


लेवाजगत न्युज पुणे :- पुणे शहरात पर्वती येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहात सहायक वसतिगृह अधीक्षक पदासाठी  इच्छुक व पात्र माजी सैनिक पत्नी, विधवा पत्नी व इतर महिला नागरीक यांनी ७ नोव्हेंबर पर्यंत आपले अर्ज सैनिकी मुलींचे वसतिगृह येथे सादर करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.


पुणे शहरात पर्वती येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहात सहायक वसतिगृह अधीक्षक हे तात्पुरत्या स्वरूपातील अशासकीय एक पद भरण्याकरिता भरती प्रक्रिया राबविण्याचे प्रस्तावित आहे. निवड झालेल्या उमेदवाराला २४  हजार ८९ रुपये इतके मानधन देण्यात येणार आहे. 



अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक शेख अब्दुल यांना भ्रमणध्वनी क्रमांक ७०२०४१०९५४ वर उमेदवारांनी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे एस. डी. (निवृत्त) यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.