Header Ads

Header ADS

पुणे ते अमरावती गाडी आजपासून दररोज धावणार,आरक्षण सुरू

 

Pune-to-Amravati-train-will-run-daily-from-today

पुणे ते अमरावती गाडी आजपासून दररोज धावणार 

लेवाजगत न्यूज भुसावळ-रेल्वे प्रशासनाने पुणे अमरावती पुणे अशी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून (दि.१०) सुरू होणाऱ्या या गाडीची पुण्याला जाण्याची वेळ भुसावळच्या प्रवाशांसाठी गैरसोयीची आहे. 

     ०९१०१ पुणे अमरावती गाडी १० नोव्हेंबर २०२३ ते १० फेब्रुवारी २०२४ या दरम्यान दररोज पुणे येथून सकाळी ११.०५ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री १२.५५ वाजता अमरावती येथे पोहोचेल. तर ०९१०२ अमरावती पुणे गाडी ११ - नोव्हेंबर २०२३ ते ११ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अमरावती येथून दररोज रात्री १०.५० वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता पुण्याला पोहोचेल. ही गाडी उरुळी, दौंड कार्डलाइन, नगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, कजगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला आणि बडनेरा थांबेल. या गाडीला सेकंड क्लास चेअरकार १३, एसी चेअरकार क्लास १, स्लीपर क्लास १ आणि सेकंड जनरल क्लास १ डबा राहील, अशी माहिती प्रशासनाने दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.