Header Ads

Header ADS

आमदारांच्या पुढाकाराने नवीन केबल टाकण्याच्या कामाचा शुभारंभ


New-cable-laying-work-initiated-by-the-initiative-of-MLAs


आमदारांच्या पुढाकाराने नवीन केबल टाकण्याच्या कामाचा शुभारंभ

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अभ्युदय नगर येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. वीज पुरवठा खंडित होत असल्याने परिसरात बेस्ट प्रशानाबद्दल प्रचंड रोष निर्माण झाला होता. परिसरात गेल्या १५ दिवसांत १० दिवस वीजेचा लपंडाव सुरू आहे. नागरिक उकाड्यापासून त्रस्त आहेत. रात्रभर विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. काही तासांपूर्वी विभागातील ८०% परिसरात वीज खंडित झाली होती. परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत बेस्ट प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केल्यास उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.



 

     वरील सर्व अडचणी विभागीय नागरिकांनी शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्याकडे मांडल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदारांनी सर्व यंत्रणा कामाला लावल्या आणि आज ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी माननीय आमदार अजय चौधरी यांच्या पुढाकाराने नवीन केबल टाकण्याचे कामाला सुरुवात केली. अभ्युदय नगर व जिजामाता नगर मधील विद्युत पुरवठा करणाऱ्या हबमध्ये लोड वेगळे करण्यासाठी इ. क्र.१७ ते १९ पर्यंत पहिल्या फेसचे काम सुरु झाले आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी खुद्द आमदार अजय चौधरी, माजी नगरसेवक दत्ताराम पोंगडे, शिवसेना शाखा २०५ चे शाखाप्रमुख जयसिंग भोसले, बेस्टचे अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विभागीय नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.