Header Ads

Header ADS

नवी मुंबईकरांची १२ वर्षांची प्रतिक्षा संपली; पहिली मेट्रो सेवा आजपासून झाली सुरू

नवी मुंबईकरांची १२ वर्षांची प्रतिक्षा संपली; पहिली मेट्रो सेवा आजपासून झाली सुरू


नवी मुंबईकरांची १२ वर्षांची प्रतिक्षा संपली; पहिली मेट्रो सेवा आजपासून झाली सुरू


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : तब्बल १२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर नवी मुंबईत राहणाऱ्या नागरिकांसाठी आज मेट्रो सुविधा सुरू झाली आहे. आज संध्याकाळी ६ वाजता बेलापूर मेट्रो स्टेशनवरून पहिली मेट्रो धावली, त्यातही मोठी गर्दी पाहायला मिळाली.  नवी मुंबईतील बेलापूर मेट्रो स्थानकापासून सुरू होणारी ही मेट्रो पेंढर मेट्रो स्थानकापर्यंत धावेल, ज्यामध्ये सुमारे ११ मेट्रो स्थानके असतील आणि ११.१० किलोमीटरचे अंतर कापले जाईल.

New-Mumbaikar's-12-year-wait-is-over-first-metro-service-started-from-today


गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईतील जनता ही मेट्रो सुरू होण्याची वाट पाहत होती. गेल्या ६ महिन्यांत या मेट्रोचे अधिकृत उद्घाटन ४ वेळा लांबले असून आज कोणत्याही अधिकृत उद्घाटनाविना ही मेट्रो नवी मुंबईकरांसाठी सुरू करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ही घोषणा केली होती, त्यात त्यांनी आजपासून मेट्रो सुरू करण्याचे आदेश दिले होते.

आजपासून मेट्रोचे नियमित कामकाज सुरू झाले असून, दररोज सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत दर १५ मिनिटांच्या अंतराने धावणार आहे. ही मेट्रो सेवा पेंदर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंदरपर्यंत दर१५ मिनिटांनी धावणार आहे. ही मेट्रो सिडकोने बांधली असून त्यात लोकांच्या आरामदायी आणि सुलभ प्रवासासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.