Header Ads

Header ADS

राष्ट्रवादी नेते आ.एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका सीएम शिंदे यांनी करून दिली एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था

NCP-leader-A-Eknath-Khadse-had-a-heart-attack- CM-Shinde-arranged-air-ambulance


राष्ट्रवादी नेते आ.एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका सीएम शिंदे यांनी करून दिली एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था

लेवाजगत न्यूज जळगाव-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. एका वृत्तवाहिणीने या संदर्भातील माहिती दिली. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ हवाई रुग्णवाहिकेची सोय करुन दिली जावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. तर पुढील काही वेळातच खडसे यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मदतीच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

हे पण बघा-धर्म कुमारी अपेक्षा मानेकर ही महानुभाव तत्त्वज्ञानाप्रमाणे,हिचा संन्यास धर्मात प्रवेश,सावदा येथे देशातील हजारो संत महंतांच्या उपस्थित कार्यक्रमाचे मानेकर बाबांनी केले आयोजन

https://youtu.be/wNblINMMwfU






दुपारच्या सुमारास खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तात्काळ त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांना याची माहिती कळल्यानंतर त्यांनी खडसे यांना उपचारासाठी मुंबईत आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यांच्यासाठी हवाई रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे.

   जळगाव येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. एकनाथ खडसे यांना मुंबईला हलविण्याची तयारी करण्यात येत होती. मात्र, तातडीने उपचार करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने या घटनेची गंभीर दाखल घेतली. त्यांनी प्रशासनाला खडसे यांच्यासाठी एअर अम्बुलन्सची व्यवस्था करण्याचा सूचना दिल्या. काही वेळातच खडसे यांना मुंबईत आणण्यात येईल आणि त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.