Header Ads

Header ADS

मुलतानी भाजकी मातीच्या अनेक मुली शिकार,विक्रीवर प्रतिबंध करा- ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांची मागणी

 

Multani-vegetable-soil-many-girls-hunt-for-sale-prohibit-senior-social worker-Dr.  Ravindra Bhole's demand

मुलतानी भाजकी मातीच्या अनेक मुली शिकार,विक्रीवर प्रतिबंध करा- ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांची मागणी 

लेवाजगत न्यूज उरुळी कांचन: -ओसीडी, सिझोफ्रेनिया, ऑटिझम, मानसिक असाध्य विकार,मतीमंद, मूकबधिरता ह्या आजारामधेमुले मुली माती  खाण्याचे प्रकरण आढळून येत असतात,मात्र अलीकडे कॉलेजमधील तरुण-तरुणी मुलतानी भाजकी माती चे सेवन करताना आढळून येत आहेत. मुलतानी भासकी मातीचे बॅरिक सिलिकेट अनेक खनिजापासून बनवले जातात. त्याचे सेवन केल्यामुळे त्वचा सुंदर गुळगुळीत, चमकदार राहते, पित्ताशयाचे विकार कमी होतात ,ह्या मातीमुळे मानसिक स्वास्थ मिळते त्याचमुळे कॅल्शियम आयर्नची कमतरता दूर होते हड्डी मजबूत होते , शरीर तजेलवान होते अशा समजूतीमुळे तरुण-तरुणी मुलतानी भाजकी मातीचे सेवन करीत आहेत. त्यामुळे मूत्र विकार ,बद्धकोष्ठता किडनी दोष, आतड्यांमुळे सूज  रक्तांची विविध विकार , थायरॉईडचे आजार, त्वचेचे आजार, डोळ्याचे विकार या आजाराला निमंत्रण देत आहेत. गर्भवती स्त्रियांनी ही माती खाल्ल्यास बालकाला धोका होऊ शकतो. तरुण-तरुणींमध्ये माती खाण्याची व्यसनधीनता घातक आहे. तसेच मुलतानी माती खाण्याच्या आहारी अनेक तरुणी ग्रासलेल्या आहेत. मुलतानी भास्की मातीच्या अनेक तरुण-तरुणी शिकार झालेले आहेत हे चित्र अत्यंत खेदजनक आहे असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. येथे महिला जनजागृती व सबलीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे पुढे म्हणाले की ही माती पाकिस्तानातून गुजरात ,राजस्थान मार्गे देशांमध्ये येत आहे. एक हजार रुपयाला एक पोते ही माती होलसेल रेटमध्ये मिळत असते. तसेच एक रुपयाला पंचवीस ग्राम ही माती ठराविक किरकोळ दुकानदारांकडे उपलब्ध असते.शासनाने ही माती विकण्यावर प्रतिबंध करावा असे मत जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार अपंग सेवक डॉ. रवींद्र भोळे वैद्यकीय विभाग प्रमुख वारकरी मंच महाराष्ट्र राज्य यांनी येथे व्यक्त केले. याप्रसंगी अनेक महिला तरुण-तरुणी उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.