Header Ads

Header ADS

'मोडी दर्पण' दिवाळी अंकाचे प्रकाशन

Modi-Darpan'-Diwali- Publication of issue


 'मोडी दर्पण' दिवाळी अंकाचे प्रकाशन


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मोडीलिपी संवर्धन करणारा आणि शिवकालीन काळावर नव्याने प्रकाश टाकणारा 'मोडी दर्पण' या दिवाळी अंकाचे प्रकाशन नुकतेच झाले.

Modi-Darpan'-Diwali- Publication of issue

एका वेगळ्या विषयामुळे दर्जेदार आणि अभ्यासनीय असा हा अंक इतर दिवाळी अंकाहून खूप वेगळा आहे. त्यातील साहित्य अत्यंत चोखंदळ असेच आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोडी लिपीतून जो पत्रव्यवहार केला त्याचा लेखाजोखा मोडी दर्पण २०२३ या अंकात वाचायला मिळणार आहे. विशेष म्हणजे घरी बसून मोडी शिकता येईल अशी मोडी ते मराठी अशी ओळख या अंकात अनुभवायला मिळते. त्यामुळे हा यावर्षीचा अंक खूप महत्वाचा वाटतो. अनेक शिव अभ्यासकांनी या अंकात हजेरी लावली असून त्यांनी लिहलेले बरेच लेख नवीन माहिती देणारे असेच आहेत. संपादक सुभाष लाड यांनी १४व्या वर्षाचं शिवधनुष्य उत्तमरीत्या पेलले आहे. मोडीलिपी अभ्यासक व शिवचरित्राचे गाढे अभ्यासक सुनील कदम हे या अंकाचे सहसंपादक आहेत. मुखपृष्ठ प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कुंचल्यातून साकारले आहे.


महाराजांच्या आरमाराविषयी, रामचंद्रपंत अमात्य कृत आज्ञापत्र, आंग्रे घराण्यातील निवडक पत्रे, जावळीचे चंद्रराव मोरे, राजेशिर्के घराणे, सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलं फोंडा, ऐतिहासिक सावंतवाडी संस्थान, सौंधेकर घराणे, मराठे असे अनेक शिवकालीन विषय या अंकात वाचायला मिळतील. 


'मोडी लिपीचा आणि शिवकालीन घडामोडींचा अभ्यास ह्या दिवाळी अंकामधून होऊ शकतो, त्यामुळे आपल्या घरात आणि आपल्या संग्रही असावा असा हा दिवाळी अंक विकत घेऊन नक्की वाचा' असे आवाहन सुप्रसिद्ध चित्रकार लेखक विजयराज बोधनकर यांनी केले आहे.

 

प्रकाशनाच्या या कार्यक्रमाच्या दरम्यान नाशिकच्या मोडीलिपी अभ्यासक दीपा गायधनी यांना मोडी लिपी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारी संपादक विजय हटकर यांनी केले. यावेळी नाटककार डॉ. मंगेश हांदे, चित्रकार सुरेश डुंबरे, लेखक सुरेश हांडे, संघाचे सरचिटणीस प्रमोद पवार, मोडी लिपी जाणकार सुनील कदम, इतिहासकार प्रविण कदम, पत्रकार सुनील आवटी, दीपक नागवेकर, महेंद्र साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.