Header Ads

Header ADS

माझी विल पॉवर मजबूत, निवडणूक लढण्याची अन प्रचाराची तयारी : खडसे खडसेंवर जळगावसह तीन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी


 माझी विल पॉवर मजबूत, निवडणूक लढण्याची अन प्रचाराची तयारी : खडसे

खडसेंवर जळगावसह तीन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी


लेवाजगत न्यूज प्रतिनिधी | जळगाव हृदयविकाराचा त्रास जाणवल्याने तातडीने मुंबईला उपचारार्थ हलवण्यात आलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी खडसेंवर जळगावसह धुळे, नंदुरबार व बुलडाणा जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. परंतु प्रकृतीमुळे खडसे फिरतील की नाही ? अशी चर्चा सुरू होती. 'माझी विल पॉवर मजबूत आहे, त्यामुळे निवडणूक लढण्याची व प्रचाराला फिरण्याची तयारी आहे अशी माहिती आमदार एकनाथ खडसेंनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली.

New-Mumbaikar's-12-year-wait-is-over-first-metro-service-started-from-today


     जानेवारीनंतर कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीचे बिगल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहेत. भाजपने तर ४५ प्लसचा नारा दिला आहे. महाविकास आघाडीतही जागा वाटपाबाबत मंथन सुरू झाले आहे. राज्यातील ४८ पैकी १० ते १२ जागांवर राष्ट्रवादीने दावा केल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेस वर्षानुवर्ष लढत असलेल्या रावेर लोकसभा मतदार संघावर यापूर्वीच राष्ट्रवादीने दावा ठोकत खुद्द एकनाथ खडसेंनी लढण्याची तयारी दाखवली होती. 

दरम्यान गेल्या दहा दिवसांपूर्वी खडसेंना छातीत दुखायला लागले होते. त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवल्याने तातडीने मुंबईला हलवण्यात आले होते. त्या संकटातून खडसे सुखरूप बाहेर पडले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अचानक आलेल्या आजारपणामुळे आता खडसे पूर्वीप्रमाणे राज्यभरात फिरतील की नाही. त्यांच्यावर निवडणूक लढण्याची टाकलेली जबाबदारी ते पेलतील की नाही ? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत होते. त्याला 'दिव्य मराठी' शी बोलताना खडसे यांनी पूर्णविराम दिला.

     पक्षाने आदेश दिल्यास लढणार : मोठ्या आजारातून बाहेर पडलो आहे. प्रचंड विल पॉवरमुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे आता फिरायला मोकळा आहे. पक्षाने जळगाव, धुळे, नंदुरबार व बुलडाणा जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. जळगाव व नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी लढणार आहे. रावेर लोकसभा मतदार संघ देखील राष्ट्रवादीच्या वाटेला येईल. त्यामुळे तीन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी असेल. मी आजारपणामुळे खचलो नसून निवडणुकीत प्रचारासाठी चारही जिल्हे पिंजून काढण्याची मानसिकता आहे. पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक देखील लढण्याची तयारी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसेंनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.