Header Ads

Header ADS

सावदेकर वासीयांचे स्नेहसंमेलन उत्साहात , शिक्षणात वरिष्ठांच्या मादर्शनाखाली प्रगती करावी- डॉ.आशा पाचपांडे यांचे गेट-टुगेदर प्रसंगी संवाद

Leva-Patil-Society-should-remain-as-a-group-and-progress-in-education-under-the-supervision-of-Dr.Asha-Pachpande-on-the-get-together-occasion-dialogue



सावदेकर वासीयांचे स्नेहसंमेलन उत्साहात , शिक्षणात वरिष्ठांच्या मादर्शनाखाली प्रगती करावी- डॉ.आशा पाचपांडे यांचे गेट-टुगेदर प्रसंगी संवाद

लेवाजगत न्यूज पुणे- येथे सावदेकर रहिवासी असलेले कामानिमित्त आणि नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या चे गेट-टुगेदर उत्साहात संपन्न झाले यावेळी श्रीमती डॉ.आशा ताई पाचपांडे त्यांनी उपस्थित लोकांशी संवाद साधला तसेच श्री. अशोक भंगाळे यांनी ग्रूप चे महत्व विशद केले या धकाधकीच्या काळात सर्वानी सोबत येणे गरजेचे आहे असे मार्गदशन आणि काहीसूचना केल्या. 

Leva-Patil-Society-should-remain-as-a-group-and-progress-in-education-under-the-supervision-of-Dr.Asha-Pachpande-on-the-get-together-occasion-dialogue



 कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, ईशस्तवन व स्वागत गीताने झाली नृत्याद्वारे गणेश वंदना सादर करण्यात आली,पिंपरी चिंचवड़ येथे सावदेकर वासियांचे पहिले स्नेहसंमेलन रविवार दिनांक २९ ऑक्टोंबर रोज़ी ए. एस. एम. ग्रूप. चे आई. बी. एम. आर. कॉलेज चिंचवड़ पुणे येथे मोठ्या थाटामाटात झाले.७०० च्या वर सावदेकर वासीयांनी या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली.

सावदेकर अ‍ॅडमिन टीम,श्री.अशोक भंगाळे सर, सौ.जागृती वायकोळे, श्री.देवेंद्र पाटील, श्री.डिगंबर बढे, श्री.धनंजय राणे, श्री.गोपाळ भंगाळे, श्री.तुकाराम बर्‍हाटे,श्री.नितीन भारंबे, श्री.रविंद्र बर्‍हाटे,श्री.वसंत बेंडाळे यांच्या अतोनात कष्टामुळे हे शक्य होऊ शकले आहे. 

    कार्यक्रमाला श्री. राहुल पंढरीनाथ कोल्हे, श्री. शैलेंद्र पूनमचंद पाटील, सौ हर्षला धनंजय राणे, श्री. प्रमोद जीवराम पाटील, श्री. योगेश भास्कर वायकोळे, श्री. स्वप्निल दिलीप सरोदे, श्री. हितेश सूर्यकांत वायकोळे, श्री. तुषार मधुकर जंगले, श्री.कुशल रमेश नेमाडे, श्री. जितेंद्र पंढरीनाथ चौधरी, श्री.मनोज लीलाधर पाटील, श्री.नीतीन पुरुषोत्तम भारंबे, श्री देवेंद्र प्रमोद राणे, श्री तुषार मोहन राणे. कार्यकर्त्यांचे अनमोल सहकार्य लाभले.

कार्यक्रमाला श्रीमती. डॉ.आशा ताई पाचपांडे. व्यवस्थापन विश्वस्त आणि सचिव एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि एएसएमचे आयबीएमआर चिंचवड येथील संचालक, श्री.अशोक भंगाळे, डॉ.मिलिंद चौधरी. जळगाव जिल्हा लेवा समाज मंडळाचे अध्यक्ष, श्री.वसंत रामजी धांडे सुप्रसिद्ध उद्योगपती, श्री.वसंत टोपा बेंडाळे, श्री.संजय भास्कर पाटील, श्री.तुकाराम बर्‍हाटे, श्री.डिगंबर बढे, श्री. देवेंद्र पाटील, श्री.रवींद्र बर्‍हाटे, श्री.गोपाळ भंगाळे हे मंचावर ऊपस्थीत होते.

     श्री धनंजय विजय राणे यानी गूगल फ़ॉर्म भरणे आणि ऑनलाईन पद्धती ची गरज काय याचे महत्व पटऊन दिले.

     लहान मूलांनी आणि महिलांनी संगीत खुर्ची चा आनंद घेतला तसेच काही मुलांनी  फॅन्सीड्रेस स्पर्धा , नृत्य सादर केले, कपल गेम्स चा सुद्धा सर्वानी आनंद घेतला सर्व विजेत्यांना बक्षिस देण्यात आले.

     कार्यक्रमाला सावदा शहरातील पुणे तेथे स्थायिक असलेल्या दिग्गज लोकांनी हजेरी लावली ज्यात डॉ.प्रफुल्ल चौधरी हे सहभागी होते. या पूर्ण कार्यक्रमाला आदरणीय श्री.वसंत टोपा बेंडाळे यांनी अन्नदान केले. जेवणामध्ये जळगाव जिल्ह्य़ातील खान्देश स्पेशल मेनू वरण बट्टी, वांग्याची भाजी, गूळ - भात आणि आमसूल ची कढ़ी असे पदार्थ होते ज्याची सर्वांनी भर भरून स्तुती केली व आस्वाद घेतला पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.