Header Ads

Header ADS

हिंदू संस्कृतीमध्ये विवाह हा एक संस्कार यज्ञ -ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे

 



हिंदू संस्कृतीमध्ये विवाह हा एक संस्कार यज्ञ -ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे

लेवाजगत न्यूज  पुणे भोसरी:- भगवान श्रीकृष्णाने अठराव्या अध्यायामध्ये तप, यज्ञ दान या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये असे , ती कर्मे केलीच पाहिजेत असे गीतेत विदीत केलेले आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दोन जीवांचे मिलन म्हणजेच विवाह ,हा सुद्धा एक संस्कार आहे यज्ञ आहे. यासाठी सात्विक भाव ठेवून जोडीदाराची निवड करावी. नियत कर्म हे कर्तव्याच्या भावनेतून करावे. जोडीदार निवडताना पॅकेज पेक्षा अंतरात्म्याचा ठाव घ्यावा व सात्विक भाव ठेवावा. विवाह या पवित्र यज्ञासाठी व्यासपीठ निर्माण करून देणे हे कार्य म्हणजे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती सारखेआहे.जीवनाचा प्रवास सुखकर व्हावा, संस्कृती टिकावी, धर्म टिकावा ,यासाठी विवाह संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये विवाह हा एक संस्कार आहे, एक महान यज्ञ आहे असे मत जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार अपंग सेवक ह भ प डॉ. रवींद्र जी भोळे यांनी येथे व्यक्त करून राज्यभरातून आलेल्या सन्माननीय वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.समता भातृ मंडळ व लेवा पाटीदार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने येथे अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी येथे वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ह्या मेळाव्याचे हे पंचवीसावे  वर्ष होते. याप्रसंगी वधू-वरांना मार्गदर्शन व आशीर्वाद देताना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी वरील मत व्यक्त केले.  

         प्रमुख पाहुणे म्हणून नामदेव ढाके नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते पिंपरी चिंचवड मनपा यांनी आपल्या भाषणात सांगितले की विवाहासाठी व्यासपीठ निर्माण करून देणे ही अत्यंत मोलाची कामगिरी आहे. त्यामुळे विवाह जुळवण्यासाठी वधू-वरांना व्यासपीठ मिळते. संस्थेतील सर्व सदस्य तन-मन-धनाने हे कार्य  गेली अनेक वर्षापासून करीत आहेत. ज्येष्ठ लेखक समाजभूषण डॉ.नीरा पाटील म्हणाले की कुंडली ,देवक, गुण, गोत्र यामुळे अनेकांची लग्न जुळण्यासाठी बाधा येत आहे, यासाठी दोन जीवांचे मनोमिलन होत असेल तर या गोष्टी जास्त विचारात घेऊ नये. व्यासपीठावर भागवत त्रंबक चौधरी, संस्थेचे अध्यक्ष सिताराम  राणे, पिंपरी चिंचवड येथील विरोधी पक्षनेते नगरसेवक नामदेव ढाके, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे एस एस आय एफ जयपुर संस्थेचे प्रदेशाध्यक्ष,डॉनी रा पाटील, एल झेड पाटील, भागवत झोपे, नितीन बोंडे ,  यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला रघुनाथ फेगडे सहसचिव, निनाद वायकोळे, सुरेश फेगडे, हेमंत झोपे, डीगंबर महाजन व समता भ्रत्रू मंडळाचे सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते. संस्थेचे सचिव रवींद्र बऱ्हाटे यांनी प्रमुख पाहुण्या चे आभार मानले.

         यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा खास सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला गोदावरी फाउंडेशनच्या डायरेक्टर डॉ. अक्षिता अनिकेत पाटील यांना सौ रेखा सिताराम राणे यांनी सन्मानित केले. या कार्यक्रमात व्यासपीठावर नवोदित वधू वर यांनी आपला परिचय देऊन जोडीदाराविषयी अपेक्षा सांगितल्या.कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन विभावरी इंगळे, रवींद्र बऱ्हाटे ह्यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.