Header Ads

Header ADS

दीपनगर ६६० प्रकल्पात उंचावरून पडल्याने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

In Deepnagar-660 project- death of migrant worker due to fall from height


दीपनगर ६६० प्रकल्पात उंचावरून पडल्याने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू 

लेवाजगत न्यूज -दीपनगर ६६० प्रकल्पात उंचावरून पडल्याने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हेतराज केशरी राठोड (४८, महुदा वॉर्ड नंबर सहा ठाणा, जि.अनुपूर, मध्यप्रदेश) असे मयताचे नाव आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, दीपनगर ६६० प्रकल्पात काम करीत असलेले हेतराज राठोड हे उंचावरून पडल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना जळगाव व तेथून भोपाळ येथील हमिदीया हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांची नुकतीच प्राणज्योत मालवली. याबाबतचे कागदपत्रे भुसावळ तालुका पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.