Header Ads

Header ADS

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी..! महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी-12वी परीक्षांच्या तारखा जाहीर


 विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी..! महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी-12वी परीक्षांच्या तारखा जाहीर

लेवाजगत न्युज नाशिक:-

 विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 


 लेखी, प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा कधी?


 लेखी परीक्षा :


 बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या दरम्यान होणार आहे, 

 दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या दरम्यान होणार आहे.


 प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा :


बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 2 फेब्रुवारी 2024 ते 20 फेब्रुवारी 2024 या दरम्यान होणार आहे. 

 दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 10 फेब्रुवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या दरम्यान होणार आहे.


 दहावी-बारावीच्या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक बोर्डाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उद्यापासून उपलब्ध होणार आहे.


 एकंदरीत, परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. तसेच इतर कोणत्याही तत्सम माध्यमातून प्रसिध्द झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये असं शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.