Header Ads

Header ADS

राजकुवर कॉलेजला हॉल तिकीट घेण्यास गेलेल्या युवकाचा हृदयविकाराने मृत्यू

 

राजकुवर कॉलेजला हॉल तिकीट घेण्यास गेलेल्या युवकाचा हृदयविकाराने मृत्यू


 लेवाजगत न्युज भुसावळ:-


शहरातील पंढरीनाथ नगरातील रहिवासी हर्षल सतीश बाणाईत (वय २१) हा पहूर येथील राजकुवर कॉलेजला हॉल तिकीट घेण्यास गेला असता, तेथेच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुकारी २.३० वाजता घडली. हर्षल बाणाईत

अमरनाथ नगरातील रहिवासी असलेले सतीश बाणाईत यांचा अष्टभुजा देवीच्या मंदिरासमोर हेअर कटींग सलूनचा व्यवसाय आहे.

 त्यांना दोन मुले आहे. त्यातील मोठा मुलगा हर्षल याने पहूर येथील राजकुवर कॉलेजमध्ये एसवाय बीकॉमला प्रवेश घेतला होता. तो शुक्रवारी दुपारी १ वाजता मित्र रडें याच्या सोबत मोटारसायकलने पहूर येथे गेला. तेथे दुपारी २.१५ वाजता पोहोचल्यावर कॉलेजमध्ये असतानाच त्याने सोबत असलेल्या मित्र रडे याला अॅसिडीटीचा त्रास होत आहे, छाती दुखत आहे, असे सांगितले. आणि त्याला चक्कर येत तो खाली कोसळला. त्यास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याला तत्काळ पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यास तपासणीअंती मृत घोषित केले. अचानक झालेल्या प्रकारामुळे मित्र रडे गोंधळला, त्याने तत्काळ भुसावळ येथे दूरध्वनीवरून माहिती दिली.



भुसावळचे मित्र पहूरला रवाना


 भुसावळ येथे हर्षल याच्या मृत्यूची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नितीन धांडे आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी तात्काळ पहूर येथे धाव घेतली. पहूर येथे ग्रामीण रूग्णालयात हर्षलचे विच्छेदन करण्यात आले. तेथून रात्री सात वाजता मृतदेह घेऊन निघाले. भुसावळ येथे रात्रीच हर्षलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अचानक झालेल्या या घटनेमुळे बाणाईत कुटुंबावर मोठाच दुखाचा डोंगर कोसळला. त्याचे सांत्वन करण्यासाठी अनेकांनी रात्री त्यांच्या घरी गर्दी केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.