Header Ads

Header ADS

शिक्षण घेऊन मोठे व्हा; आई-वडिलांचे, शिक्षकांचे उपकार कधीही विसरू नका शिंदी येथे सेवानिवृत्त नायब तहसीलदार सपकाळेंचे प्रतिपादन

Grow-up-with-education-never-forget-the-thanks-of-parents-and-teachers-retired-deputy-tehsildar-Sapkal-at-Shindi


शिक्षण घेऊन मोठे व्हा; आई-वडिलांचे, शिक्षकांचे उपकार कधीही विसरू नका शिंदी येथे सेवानिवृत्त नायब तहसीलदार सपकाळेंचे प्रतिपादन 

लेवाजगत न्यूज सावदा-शाळा आणि शिक्षकांमुळेच विद्यार्थी घडत असतो. त्यामुळे परिस्थिती कशीही असो शिक्षण घेऊन मोठे व्हावे. उच्च शिक्षित होऊन विविध पदांवर कार्यरत होऊन देशाची सेवा करावी. आपल्या आई-वडिलांचे, शिक्षकांचे उपकार विसरू नका, असे प्रतिपादन सेवानिवृत्त नायब तहसीलदार कमल सपकाळे-वाघ यांनी केले.

    शिंदी (ता. भुसावळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शाळेच्या माजी विद्यार्थिनी तथा सेवानिवृत्त नायब तहसीलदार कमल सपकाळे-वाघ यांनी आपले आई-वडील बहिण आणि देवराम सपकाळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि दिवाळी फराळ वाटप केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या नवनिर्वाचित सरपंच सुनीता सपकाळे अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न समिती संचालक कैलास पाटील, समर्थ नर्सरी संचालक बन्सीलाल पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सपकाळे, कवी तथा साहित्यिक शिक्षक सुभाष मोरे, सोपान सपकाळे, संदीप सपकाळे, राहुल पाटील, वंदना जाधव, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य चारुलता कोल्हे, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी तायडे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि यशस्वितेसाठी उपशिक्षक समाधान जाधव यांनी परिश्रम घेतले.

     शाळा अन् शिक्षकांचे अनंत उपकार

      यावेळी कार्यक्रमात सेवानिवृत्त नायब तहसीलदार कमल सपकाळे यांनी सांगितले की, आमच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. माझे वडील गावातील पोलिस पाटील यांच्याकडे मजुरीने कामाला जायचे. आमच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मागायचे. आज आम्ही तिन्ही बहिणी शिक्षण घेऊन नोकरीला लागले. या शाळेचे, शिक्षकांचे आमच्यावर अनंत उपकार आहे. त्याची एक परतफेड म्हणून, आम्ही आज साहित्य वाटप करत आहोत. मुलांनो तुम्ही सुद्धा चांगले शिक्षण घेऊन भारताचे सुजाण नागरिक व्हा, असे आवाहन सपकाळे यांनी यावेळी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.