Header Ads

Header ADS

चिनावल ग्रामपंचायत वर ग्रामविकास पँनल चा झेंडा

 

Flag-of-Chinaval-Gram Panchayat-Var Vikas-Panel

चिनावल ग्रामपंचायत वर ग्रामविकास पँनलचा झेंडा 

लेवाजगत न्यूज चिनावल ता रावेर ( वार्ताहर ) रावेर तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत दि ५ रोजी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित ग्रामविकास पँनल च्या लोकनियुक्त सरपंच सह १२ जागांवर विजय मिळवून पूर्ण बहुमत मिळवले तर प्रतिस्पर्धी भाजप पुरस्कृत नम्रता पँनल ला ५ व अपक्ष १ अशा जागांवर विजय मिळविला.

      चिनावल येथील ग्रामपंचायत निवडणूकी चे झालेल्या मतदानाची आज मतमोजणी झाली यात ग्रामविकास पँनल च्या ज्योती संजय भालेराव ह्या लोकनियुक्त सरपंच पदी ३४९१ मते मिळवून विजयी झाल्या आहेत. 

    तर प्रभाग क्रमांक १ मध्ये नम्रता पँनल च्या पाटील ठकसेन भास्कर ( ४०१ ) बोरोले प्रियंका कुंदन ( ७२२ ) व पाटील प्रियंका मोहन (  ६४१     ) हे विजयी झाले आहे प्रभाग क्रमांक २ मध्ये मालखेडे हर्षा दिवाकर ( बिनविरोध  ) तर डॉ सागर नीळकंठ चौधरी ( ८८२ ) भालेराव अंजली नितिन  ( ८९० ) मते घेवून विजयी झाले प्रभाग क्रमांक ३ मध्ये बोरोले ममता संदीप ( बिनविरोध ) तर नेमाडे जितेद़ सोनजी ( ३०३ ) प्रभाग क्रमांक ४ मध्ये खाटिक अखलाक मजिद, भंगाळे हेमांगी चंद्रकांत, शे नजिर शे बशिर ( बिनविरोध  ) तर प्रभाग क्रमांक ५ मध्ये भालेराव शेषराज दिनकर (   ८०१   ) शाहिद शे मोहम्मद मण्यार, व शाहिनबी शे जब्बार, ( बिनविरोध  ) तर प्रभाग क्रमांक ६ मध्ये महाजन मनिषा अनिल  ( बिनविरोध )  भारंबे सागर गोपाळ  ( ४०५ ) व अपक्ष सौ कविता गिरिश नारखेडे  ( ५३२ ) मते घेवून विजयी झाले आहेत.  

     आज लागलेल्या या निवडणुकीत सत्ताधारी ना डावलत काँग्रेस प्रणित ग्रामविकास पँनल ला ग्रामस्थांनी कौल दिला  विजयी सर्व उमेद्वारांचे गावात जंगी स्वागत करण्यात आले .तहसिलदार बंडू कापसे, मंडलाधिकारी जे  डी बंगाळे, तलाठी, निवडणूक अधिकारी विलास कोळी, व महसूल च्या कर्मचाऱ्यांनी तसेच सावदा पोस्टे चे सपोनि जलिंदर पळे यांनी या वेळी उत्कृष्ट नियोजन केले होते.  तर विजयी ग्रामविकास पँनल ला विजयी करण्यासाठी माजी सरपंच चंद्रकांत भंगाळे, संजय भालेराव सर, शे ईरफान हाजी कुतुबुद्दीन, हयातखान हाजी वायदखान, पँनल चे सर्व प्रमुख कार्यकर्ते, उमेदवार यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.