Header Ads

Header ADS

इटवा जवळ धावत्या दिल्ली दरभंगा एक्सप्रेसला आग

 


इटावा जवळ धावत्या दिल्ली दरभंगा एक्सप्रेसला आग

लेवाजगत इटावा -येथे धावणाऱ्या नवी दिल्ली-दरभंगा एक्सप्रेसला बुधवारी आग लागली. ट्रेनचा १ जनरल डबा पूर्णपणे जळाला. चालत्या ट्रेनमध्ये धुराचे लोट उठत असल्याचे पाहून प्रवाशांमध्ये घबराट पसरली. प्रवाशांनी ट्रेनमधून उडी मारून आपला जीव वाचवला. सायंकाळी ६ वाजता सराई भूपत रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. त्यावेळी ट्रेनचा वेग २० ते ३० किमी दरम्यान होता असे सांगण्यात येत आहे. बोगीमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी होते.


इटावा जवळ धावत्या दिल्ली दरभंगा एक्सप्रेसला आग


   बोगी ट्रेनपासून वेगळी करण्यात आली

आग कशी लागली? सध्या त्याची नेमकी कारणे कळू शकलेली नाहीत. माहिती मिळताच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त स्थानिक पोलीस दल दाखल झाले. ज्या बोगीत आग लागली होती. ती ट्रेनपासून वेगळी करण्यात आली आहे.

    १६ गाड्या थांबवण्यात आल्या

रेल्वेचे पीआरओ अमित सिंह यांनी सांगितले की, आगीमुळे कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. एस-१ कोचमध्ये आग लागली. त्याचे पुढील आणि मागील डबे एस२, एस३ आणि एसएलआर देखील खबरदारीचा उपाय म्हणून वेगळे करण्यात आले आहेत. आग ९० टक्के विझवण्यात आली आहे. सव्वा सहाच्या सुमारास आग लागली, तिने काही वेळातच विक्राळ रूप घेतले. 

    नवी दिल्ली-दरभंगा (०२५७०) एक्सप्रेस ट्रेनला अपघात झाला आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या अपघातात दोन प्रवासी भाजले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.