Header Ads

Header ADS

फळ पिक विमा बाबत शेतकऱ्यांना असलेल्या विविध समस्याबाबत, खासदार रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतली आढावा बैठक


 फळ पिक विमा बाबत शेतकऱ्यांना असलेल्या विविध समस्याबाबत, खासदार रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतली आढावा बैठक


लेवाजगत न्युज जळगाव:- पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” सन २०२२ मध्ये विमा उतरविलेला शेतकऱ्यांना आजपावतो पिक नुकसानी बाबत पिक विम्याचा लाभ प्रलंबित असून, सदर शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच पिक विम्याच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार अशी माहिती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आली होती, परंतु फक्त थोड्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले होते आणि अनेक शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ केव्हा मिळणार याबाबत शंका होती, त्याबाबत आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री.प्रणव कुमार तसेच विमा कंपनी प्रतिनिधी व कृषी अधिकारी यांच्यासह बैठक बोलावली होती.


यावेळी शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ उशिर का होत आहे, तसेच पिक विमा संकेतस्थळावर शेतकऱ्यांना कशाच्या आधरे अप्रूवल देण्यात येत आहे, आणि पिक विमा संकेतस्थळावर येणाऱ्या त्रांत्रिक अडचणी लवकरात लवकर सोडवू, शेतकऱ्यांना शक्य तेवढ्या लवकर प्रलंबित पिक विम्याचा लाभ देण्यात यावा मागणी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी कृषी आयुक्त यांच्याकडे दूरध्वनी द्वारे केली. तसेच तत्काळ शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या सोडवून योग्यती माहिती पुरविणे बाबत विमा कंपनी प्रतिनिधी आणि कृषी अधिकारी यांना सूचना केल्या.



यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री.प्रणव कुमार, तसेच सुरेश धनके, श्रीकांत महाजन, हरलाल कोळी, भरत महाजन, शिवाजी पाटील, ईश्वर रहाणे, अतुल पाटील, सागर पाटील, विकास पाटील, प्रशांत महाजन, विशाल महाजन, राहुल महाजन, शुभम पाटील, मोहन महाजन, अमोल पाटील, प्रशांत महाजन, मुनाफ सर, राहुल पाटील, भागवत कोळी, उदय चौधरी, पंकज पाटील, हर्षल चौधरी, राहुल पाटील, महेश महाजन, भागवत महाजन, नितीन राणे, सागर महाजन, भरत पाटील आणि विमा कंपनी प्रतिनिधी, कृषी अधिकारी, बँक अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.