Header Ads

Header ADS

एकता कल्चरल अकादमीचे ३५वे वर्ष; यंदा विरार येथील भाऊसाहेब वर्तक हॉलमध्ये रंगणार महोत्सव


Ekta-Cultural-Academy-35th-year-festival-will-be-held-at-Bhausaheb-Vartak-Hall-this-year-at-Virar


एकता कल्चरल अकादमीचे ३५वे वर्ष; यंदा विरार येथील भाऊसाहेब वर्तक हॉलमध्ये रंगणार महोत्सव

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या एकता कल्चरल अकादमीचे ३५वे वर्ष असून यंदाचा एकता सांस्कृतिक महोत्सव विरार येथील भाऊसाहेब वर्तक हॉल येथे  २२ ते २४ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवात राज्यस्तरीय अभिनय, गायन, काव्यवाचन, एकेरी नृत्य, समूह नृत्य तसेच महिलांसाठी विशेष कोळी नृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, मुंबई आणि महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील तसेच महाविद्यालयीन कलावंतांनी या महोत्सवात सहभाग होण्याचे आवाहन एकताचे अध्यक्ष कवी प्रकाश गणपत  जाधव यांनी केले आहे.

        

  महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या ५०० कलावंतांना एकतातर्फे  गौरविण्यात येईल. या महोत्सवातील समूह नृत्य स्पर्धांतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाची रोख पारितोषिकं अनुक्रमे १००००, ७०००, ५००० तसेच पारंपारिक नृत्य, उत्तेजनार्थ, उत्कृष्ट अभिनय, गायन, काव्यवाचन, एकेरी नृत्यासही पारितोषिकं दिली जाणार आहेत. तसेच महिलांच्या विशेष कोळी नृत्यसाठी ७०००, ५०००, ३००० रूपयांची रोख पारितोषिकं देण्यात येणार आहेत. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १७ डिसेंबर असून विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोख पारितोषिकं देण्यात येतील. तसेच महोत्सवाचा सांगता सोहळा व पुरस्कार वितरण समारंभ गिरगाव येथील साहित्य संघ नाट्यगृहात  १३ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार आहे. असे संस्थेचे उपाध्यक्ष उज्जय आंबेकर, सचिव प्रकाश पाटील, प्रसिद्धी प्रमुख विष्णू सोनावणे यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क :- ९२२०८९९१२०, ८६६८५०२६१९, ८१७७८७०५८६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.