Header Ads

Header ADS

दीपावलीच्या दिवसातही महापालिकेची कचरा व प्लास्टिक संकलनाची विशेष मोहीम!


 दीपावलीच्या दिवसातही महापालिकेची  कचरा व प्लास्टिक संकलनाची विशेष मोहीम!

 लेवाजगत न्युज कल्याण:-

 गेल्या तीन दिवसात 7.5 टन कचरा व सहा टन प्लास्टिकचे संकलन!


 महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे दिलेल्या निर्देशानुसार दीपावलीच्या कालावधीतही घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी कल्याण डोंबिवली परिसरात कचरा व प्लास्टिक संकलनाची विशेष मोहीम सुरू ठेवली आहे.(lewajagat news)

 

या मोहिमेमध्ये दीपावलीच्या कालावधीत ,सुट्टीच्या दिवशी देखील उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारां मार्फत रस्त्यावर झालेला फटाक्यांचा कचरा तसेच रस्त्यांवर, रस्त्यावरील  पदपथांवर, रस्त्यांच्या दुभाजकांवर आढळून आलेला प्लास्टिक कचरा नियमित स्वरूपात उचलण्याची कार्यवाही करण्यात आली. यामध्ये फटाक्यांचा सुमारे 7.5 टन कचरा आणि सहा टन प्लास्टिक कचरा, विल बारो (ढकल गाडी) चा वापर करून संकलित करण्यात आला.  सदर कचरा पुढील प्रक्रियेसाठी महापालिकेच्या बारावे येथील प्लांट वर पाठवण्यात आला आहे.(lewajagat news)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.