Header Ads

Header ADS

धर्म कुमारी अपेक्षा हिचा संन्यास दीक्षाविधी, महानुभाव पंथाने हिंदू धर्माला दिशा देण्याचे काम केले मान्यवर संतांचे धर्म संमेलनात संदेश

 

Dharma-Kumari-expects-her-sannyas-initiation-rite,-Mahanubhava-sect-has-worked-to-give-direction-to-Hindu-religion-message-of-respectable-saints-in-Dharma-meeting


धर्म कुमारी अपेक्षा हिचा संन्यास दीक्षाविधी,

महानुभाव पंथाने हिंदू धर्माला दिशा देण्याचे काम केले मान्यवर संतांचे धर्म संमेलनात संदेश

लेवाजगत न्यूज सावदा -येथे धर्म कुमारी अपेक्षा हिचा संन्यास दीक्षाविधी कार्यक्रम संपन्न होत असताना धर्म संमेलनाचे ही आयोजन करण्यात आले होते. कोचुर रोडवरील कुलसुमबाई अख्तर हुसेन बोहरी मंगल कार्यालयात रविवारी सकाळी धर्म संमेलनाचे महानुभाव पंथाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यात देशभरातील साधुसंत महंत सह राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


हे पण बघा-धर्म कुमारी अपेक्षा मानेकर ही महानुभाव तत्त्वज्ञानाप्रमाणे,हिचा संन्यास धर्मात प्रवेश,सावदा येथे देशातील हजारो संत महंतांच्या उपस्थित कार्यक्रमाचे मानेकर बाबांनी केले आयोजन

https://youtu.be/wNblINMMwfU


  यावेळी दहा महानुभाव पंथांच्या संतांच्या हस्ते दोन समईच्या दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर संन्यास दीक्षा घेणारी हिला दीक्षा देण्यात आली यावेळी विधी व तिला पूजन करून संन्यास धर्मात प्रवेश देण्यात आला. यावेळी मान्यवर संतांनी तिला शुभाशीर्वाद दिले व एवढ्या अँड्रॉइड मोबाईल व अत्याधुनिक युगात एका मुलीने संन्यास धर्मात प्रवेश केला तिचे त्यावेळी स्वागतही केले व त्यांच्या आई-वडिलांना नाही आशीर्वाद दिले की आपली एक मुलगी या संन्यास धर्मात प्रवेश करीत आहे त्याबद्दल आपण पुण्यवान आहात असेही यावेळी संतांनी सांगितले. या युगातही या युवतीने धर्मकार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला हे महनिय आहे. महानुभाव पंथाला जगात पोहोचवण्याचं काम संत विभुतींनी केले महानुभाव पंथाने धर्माची दशा बदलवण्याचे कामही केले.  योग्य ती दिशा देऊन धर्मसंचलन केले असे प्रतिपादनही मान्यवर महंत, संत यांनी यावेळी विचार व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांसह हजारो संत महंत उपस्थित होते.

हे पण बघा-सावदा येथे महानुभाव पंथांचे संन्यास दीक्षा विधी व संत संमेलनाची भव्य शोभा यात्रेने भक्तिमय सुरुवात

https://youtu.be/Bzwuoipn1mg



सावदा येथे संत संमेलन व दीक्षाविधी कार्यक्रमास आचार्य हर्षीकर बाबा, माहुरकर बाबा, आचार्य बिडकर बाबा, आचार्य लासुरकर बाबा ,आचार्य कारंजेकर बाबा, आचार्य दर्यापूरकर बाबा, आचार्य विद्वांस बाबा, आचार्य हलशिकर बाबा, आचार्य राहेरकर बाबा, आचार्य सुरेश मानेकर बाबा, आचार्य जामोदकर बाबा, आचार्य गोपीराज बाबा, आचार्य सातारकर बाबा, आचार्य मराठे बाबा, आचार्य राजधर बाबा, आचार्य बाभुळगावकर बाबा, आचार्य संतराम बाबा (जम्मू) मुरारमल बाबा(फगवाडा) कान्हेकर  बाबा (दिल्ली) सागर दादा (अमृतसर) माधेराज बाबा( खतोली) सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिराचे शास्त्री अनंत प्रकाश दासजी, शास्त्री श्रीजी स्वामी यांची उपस्थिती होती. राजकीय क्षेत्रातील युवा नेते धनंजय चौधरी रोहिणी खडसे यामिनी चंद्रकांत पाटील नंदू महाजन अमोल जावळे राजेंद्र चौधरी अनिता येवले करुणा पाटील य यांची उपस्थिती होती.

  दोन दिवसीय या कार्यक्रमास शनिवारी स्त्री मूर्तीस मंगल स्नान अभिषेक श्रीमद् भगवद्गीता पारायण श्री पंचावतार उपहार महोत्सव भजन कीर्तन व रविवार सकाळी श्री दत्तात्रेय प्रभूच्या पवित्र विशेषास मंगल स्नान अभिषेक श्रीमद् भगवद्गीता पारायण भेटकार्ड धर्म ध्वजारोहण धर्मसभा संन्यास दीक्षाविधी व दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले होते या संतांच्या उपस्थितीमुळे परिसराला चैतन्य चे वातावरण तयार झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.