Header Ads

Header ADS

रोझोद्यात संगीतमय रामायण कथा सोहळा देवीदेवतांचे सजीव देखावे ठरले लक्षवेधी आज पासून श्री राम कथेस सुरुवात

 

Daylight-musical-Ramayana-story-festival-lively-appearances-of-Goddess-becomes-attractive-today-since-Sri-Rama-Kathas-began

रोझोद्यात संगीतमय रामायण कथा सोहळा देवीदेवतांचे सजीव देखावे ठरले लक्षवेधी

आज पासून श्री राम कथेस सुरुवात

लेवाजगत न्यूज सावदा:- रोझोदा येथे श्रीराम मंदिर व श्री विठ्ठल मंदिर शताब्दी पूर्ती महोत्सवानिमित्त संगीतमय रामायण कथेची भव्य दिव्य ग्रंथदिंडीने मिरवणुकीने सुरुवात झाली. दिंडीत राम, लक्ष्मण, सीता व हनुमंत यांचे सजीव देखावा साकारला होता.

   

Daylight-musical-Ramayana-story-festival-lively-appearances-of-Goddess-becomes-attractive-today-since-Sri-Rama-Kathas-began

 श्रीराम मंदिर व कामसिद्ध मंदिर विश्वस्त मंडळातर्फे २६ पासून संगीतमय रामायण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रविवारी दुपारी शोभायात्रा काढण्यात आली. सरपंच पुष्कर पाटील यांच्या हस्ते पूजन झाले. कामसिद्ध मंदिर येथे समारोप झाला. सोमवार सकाळपासून पाच वाजता काकड आरती, सहाला विष्णुसहस्रनाम, दुपारी १२ ते ४ या वेळात संगीतमय श्रीराम कथा, संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ, दररोज रात्री आठ ते दहा किर्तन असा कार्यक्रम असून कथावाचन मंगेश महाराज वराळे दाताळा करत आहेत. कार्यक्रमास उपस्थित  राहण्याचे आवाहन विजय महाजन,  टेनुदास टोंगळे, विलास बोंडे, नितीन चौधरी, लक्ष्मण धांडे, वसंत बोंडे, विमल धांडे, रमेश महाजन, रुपेश फेगडे, गुणवंत टोंगळे ,मिलिंद वायकोळे ,महेंद्र भारंबे यांच्यासह आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.