Header Ads

Header ADS

दलित आणि आदिवासी समाजाचा शत्रू 'कॉंग्रेस' !

 

दलित आणि आदिवासी समाजाचा शत्रू 'कॉंग्रेस' !


लेवाजगत न्युज:- पांढुर्णा (मध्य प्रदेश) विधानसभा मतदारसंघात आयोजित जाहीर सभेमध्ये उपस्थित जनतेला आपले बहुमूल्य मत भाजपाचे उमेदवार प्रकाशभाऊ उईके यांना देण्याचे आवाहन केले. यावेळी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी जी, डॉ. परिणय फुके आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


परकीय ब्रिटिश राजवटीचा पाया हादरवून सोडणारे आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! जनजातीय गौरव दिनानिमित्त, मा. मोदीजींनी आदिवासी समाजाच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी ₹24,000 कोटींची कल्याणकारी योजना जाहीर केली आहे.

अनेक दशक विकासापासून उपेक्षित समाजातील मागास घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ₹11,000 कोटींची पीएम विश्वकर्मा योजना देखील सुरू केली आहे.


मा. मोदीजी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने मध्य प्रदेशातील आदिवासी समाजाचा अभिमान वाढवण्यासाठी, त्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी, विकसित आणि समृद्ध करण्यासाठी तसेच त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी काम केले. आदिवासी समाजाचा समृद्ध वारसा, संस्कृती, कला आणि इतिहास ही भारताची खरी ओळख आहे.

काँग्रेसने नेहमीच दलित आणि आदिवासी समाजाचा अपमान केला आहे. दलित आणि आदिवासी समाज हा काँग्रेससाठी फक्त व्होट बँक आहे. काँग्रेसच्या प्रदीर्घ काळातील कुशासनामुळे दलित, आदिवासी, वंचित, शोषित, मागासलेले लोक आजही गरिबी आणि दु:खात जगत आहेत. गेली अनेक दशके ‘गरिबी हटाव’चा नारा देणाऱ्या काँग्रेसने सत्तेत असताना नेहमीच मागास समाजाचे शोषण केले. दलित, आदिवासी आणि मागासलेल्या समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाला फक्त काँग्रेसच दोषी आणि जबाबदार आहे.(lewajagat news Up)


अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ध्वस्त करणारे कमलनाथ पुन्हा कधीही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. जाहीर सभेमध्ये उसळलेल्या जनसमुदायाचा जोश, जल्लोष आणि उत्साह पाहता मला खात्री आहे की, मध्य प्रदेशमध्ये भाजपाच पुन्हा प्रचंड बहुमताने आपले सरकार स्थापन करेल.(lewajagat news)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.