Header Ads

Header ADS

सुविधा न देता कर वाढ, अवास्तव मूल्यांकनावर नागरिकांचा आक्षेप वाढीव कर आकारणीच्या ११०० हरकतींवर सावदा येथे सुनावणी

 

Citizens' objections to non-convenience-taxation-increase-unrealistic-assessment-hearing-at-Savda-at-1100-movements

सुविधा न देता कर वाढ, अवास्तव मूल्यांकनावर नागरिकांचा आक्षेप

वाढीव कर आकारणीच्या ११०० हरकतींवर सावदा येथे सुनावणी

लेवाजगत न्यूज सावदा-सावदा पालिकेने गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून नवीन मूल्याधिकरणा कर आकारणीसाठी मालमत्ताधारकांना नोटीस पाठवल्या होत्या. या वाढीव आकारणीवर मालमत्ता धारकांना हरकती घेतल्या होत्या. त्यावर मंगळवारी समितीसमोर सुनावणी घेण्यात आली. या समितीत नगररचना विभागाचे अधिकारी विघ्नेश तायडे अमोल मगरे व पालिका कर्मचारी प्रशासकीय अधिकारी सचिन चोळके कर निरीक्षक पाटील वसुली क्लर्क अरुण ठोसरे राजेंद्र साळी यांच्या सह इतर कर्मचारी यांचं समावेश होता.

Citizens' objections to non-convenience-taxation-increase-unrealistic-assessment-hearing-at-Savda-at-1100-movements


     पालिका क्षेत्रात मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून नवीन कर आकारणीचे पत्रके वाटली होती. त्यात घरपट्टी आकारणी अवास्तव असल्याचा आक्षेप असलेल्या मालमत्ता धारकांनी पालिकेत हरकती घेतल्या होत्या. त्यावर मंगळवारपासून सुनावणी सुरू झाली. बुधवारी देखील ही सुनावणी होईल. दरम्यान, मंगळवारी सकाळी १०.३० ते दुपारी ४ अशी टप्याटप्याने सुनावणी घेण्यात आली. त्यासाठी जळगाव नगररचना विभागाचे तीन अधिकारी व पालिका कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, सावदा शहरात एकूण ७ हजार मालमत्ता धारक आहेत. पण, वाढीव घरपट्टीवर फक्त ११०० नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत. इतरही नागरिकांनी ऐनवेळी सुनावणी घेण्याचा आग्रह धरला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.