Header Ads

Header ADS

भुसावळात लिंगायत कोष्टी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा


 भुसावळात लिंगायत कोष्टी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा


लेवाजगत न्युज भुसावळ :- भुसावळात लिंगायत कोष्टी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा

लिंगायत कोष्टी समाज सेवा मंडळ भुसावळ तर्फे चौथा राजस्तरीय वधू वर परिचय मेळावा रविवारी २६ नोव्हेंबर रोजी कोळी समाज मंगल कार्यालय, गजानन महाराज नगर, भुसावळ येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा कारागृह नंदुरबारचे प्रशासन अधिकारी रविंद्र कोष्टी राहतील.

  


मेळाव्याचे उद्घाटन माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराजभाऊ लोणारी यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त अवर सचिव प्रमोद कानडे (कल्याण) आदिवासी विकास विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी राजेंद्र लवणे (जळगाव), आदर्श शिक्षक गौरवांकित अजय अडिकने (शेंदोळा खुर्द), ग्लोबल एचसीएल टेक्नॉलॉजीजचे प्रमुख आणि संचालक हेमंत कोष्टी (भोपाळ) प्रमुख अतिथी म्हणून सहायक सरकारी अभियोक्ता या पदावर  निवड झालेल्या. ॲङ श्रीमती वृशाली उमराणे कोष्टी, बँक ऑफ इंडियाचे एस.डब्लु.ओ सौ. सुषमा तपकिरे ( छ.संभाजी नगर) मोहन क्षिरसागर,सुरत उपस्थित राहणार आहे. विवाहेच्छुकांची नाव नोंदणी मेळाव्यात होईल. या मेळाव्यासाठी राजेश कोष्टी, दिपक कोष्टी, दिपक विनंते, विनय कुमार कोष्टी, सतिश घोडके,  सचिन कोष्टी, संजय खोडके, दिपक कोंगे, दिनकर सरोदे, रविंद्र कोष्टी यांच्यासह महात्मा बसवेश्वर युवा प्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते व लिंगायत कोष्टी समाज महिला मंडळाच्या सदस्या अथक परिश्रम घेत आहे.

  या मेळाव्याला समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मुकेश कोष्टी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.