Header Ads

Header ADS

बदलापूर लेवा युथ फोरमने आदिवासी पाड्याला जाऊन केली दिवाळी साजरी "एक हाथ मदतीचा, एक हाथ प्रेमाचा"

 

बदलापूर लेवा युथ फोरमने आदिवासी पाड्याला जाऊन केली दिवाळी साजरी

"एक हाथ  मदतीचा, एक हाथ प्रेमाचा"

     

           लेवाजगत न्युज बदलापूर:-  दि.१३-११-२०२३ सोमवार रोजी लेवा युथ फोरम सलंग्न, बदलापूर लेवा युथ फोरम टीम मार्फत स्वतः सामूहिक पद्धतीने फराळ बनवून बदलापूर शहरजवळील कोंडेश्वर आदिवासी पाड्याला जाऊन गोरगरीब आदिवासी ह्यांना दिवाळी व भाऊबीज निमित्त दिवाळी फराळ आणि संपूर्ण नवीन कपडे म्हणजे साडी व ड्रेस ह्यांचे वाटप उपक्रम राबवण्यात आला.


              त्यामध्ये लेवा युथ फोरम टीम बदलापूर मधील श्री, हितेश भोळे,श्री, किरण बोंडे,श्री, मयूर पाटील,श्री. संदीप पाटील,श्री,मनोज राणे,श्री.सचिन नेमाडे,श्री, स्वप्नील नेमाडे,श्री, बाळू नेमाडे,श्री,विकास फिरके,श्री, प्रीतम पाटील,श्री. अमोल पाटील,श्री, जितेश सरोदे,श्री,उमेश सरोदे,कु,तुषार चौधरी युथ मेम्बर ने सक्रिय सहभाग घेतला.


तसेच बदलापूर लेवा समाज मंडळ अध्यक्ष श्री .गेंदा पाटील सर व श्री रामदास पाटील जेष्ठ समाजसेवक ह्यांनी सहभाग घेऊन आपली विशेष उपस्थिती नोंदवली.


संपूर्ण उपक्रम राबवताना श्री हर्षल भंगाळे,अध्यक्ष लेवा युथ फोरम व निषाताई अत्तरदे ह्यांचे अनमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.