Header Ads

Header ADS

कर्जत जामखेड येथील चार हजार मुली झाल्या स्वयंसिध्दा

 

Karjat-Jamkhed-here-four-thousand-girls-became-Swayamsiddha


कर्जत जामखेड येथील चार हजार मुली झाल्या स्वयंसिध्दा

 लेवाजगत न्यूज उरण प्रतिनिधी सुनिल ठाकूर -कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माननीय रोहित दादा पवार वाढदिवसानिमित्त व सन्माननीय सुनंदाताई पवार आईसाहेब यांच्या संकल्पनेतून व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या माध्यमातून महिला स्वसंरक्षण अभियान राबविण्यात आले. 

Karjat-Jamkhed-here-four-thousand-girls-became-Swayamsiddha





     या अभियानाचा मुख्य उद्देश कर्जत जामखेड मधील मुलींना संरक्षणाचे धडे मिळावे आमदार रोहित दादा पवार यांच्या दूरदृष्टीमुळे भौतिक विकासाबरोबर सामाजिक विकास तसेच मतदार संघातील वैयक्तिक विकासावरती भर दिलेला आहे आणि याचाच भाग म्हणून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत या कार्यक्रमाप्रसंगी आंतरराष्ट्रीय कराटेपट्टू तथा लोकसत्ता दुर्गा पुरस्कारार्थी तपस्वी नंदकुमार गोंधळी- रायगड,  आंतरराष्ट्रीय ज्युदो खेळाडू सुनीता पाटील- कोल्हापूर, राष्ट्रीय खेळाडू साक्षी संतोष पाटील- रायगड, स्वयंसिध्दा प्रशिक्षिका अश्विनी जानू पारधी- रायगड, स्वयंसिध्दा प्रशिक्षिका सई सचिन नाईक- रायगड या कर्जत आणि जामखेड मध्ये स्वयंसिध्दा प्रशिक्षणाचे धडे मुलींना देत आहेत व मुलींना सक्षम करत आहेत विशेष म्हणजे हे सर्व धडे मुलींना आवडत आहेत त्यांना याची गरज वाटते. कर्जत मधील दादा पाटील महाविद्यालय, सौ.सोनाबाई  नामदेवराव सोनमाळी कन्या विद्यामंदिर, समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कर्जत, कोटा मेंटर्स प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राशीन, लोकनायक  जयप्रकाश नारायण विद्यालय खेड, श्री धाकोजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव डाकू, नागेश व कन्या विद्यालय जामखेड, ल.ना विद्यालय जामखेड, खर्डा इंग्लिश खर्डा, नंदा देवी विद्यालय, नान्नज, श्री छ्त्रपती शिवाजी विद्यालय, जवळा या दोन्ही तालुक्यामधून 4 हजार मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले याबाबत मुलींनी आपल्या अभिप्रायाद्वारे आमदार रोहित दादा पवार व स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या तपस्वी गोंधळी यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.