नाशिक येथे संत राजेंद्र सिंह जी यांचा दोन दिवस सत्संग -कार्यक्रम उपस्थित राहण्याचे आवाहन
नाशिक येथे संत राजेंद्र सिंह जी यांचा दोन दिवस सत्संग -कार्यक्रम उपस्थित राहण्याचे आवाहन
लेवाजगत न्यूज नाशिक -सावन कृपाल रुहानी मिशनचे अध्यक्ष, संत राजिंदर सिंह जी महाराज यांच्या कृपेने देवळाली, जिल्हा नाशिक येथे दिनांक 12 ऑक्टोबर व 13 ऑक्टोबर 2023 रोजी दोन दिवसीय सत्संग आणि नामदान (अनुग्रह) कार्यक्रमासाठी आगमन होणार आहे.
संत राजिंदर सिंह जी महाराज यांना ध्यान-अभ्यासाच्या माध्यमातून संपूर्ण विश्वभरात आंतरिक व बाह्य शांतिचा प्रसार करण्याकरीता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झालेली आहे. पूर्ण विश्वभरात ध्यान-अभ्यासाचे गुरु आणि विश्वप्रसिद्ध लेखक संत राजिंदर सिंह जी महाराज मागील 30 वर्षापासून शांति, प्रेम व मानव एकतेच्या संदेशाचा प्रसार विश्व भरात करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
संत राजिंदर सिंह जी महाराज यांचे जीवन, त्यांचे कार्य मानव जीवन आणि त्याचा मुख्य उद्देश यांच्या प्राप्ती करिता प्रेम आणि निरंतर निस्वार्थ सेवेचे व्रत आहे. त्यांनी विश्वभरात सर्व क्षेत्रातील लाखो लोकांना ध्यानाभ्यासाची विधी शिकवून आपल्या वास्तविक आत्मिक रुपाशी जोडण्याचे महान कार्य केले आहे. त्यांचा संदेश आशा, प्रेम, मानव एकता आणि निस्वार्थ सेवेचा आहे. संत राजिंदर सिंह जी महाराज यांची ध्यानाभ्यास या विषयावरील पुस्तके सर्वोच्च विक्रीचा उचांक नोंदविणारे विश्व प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांची पुस्तकं 55 पेक्षा अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्यांच्या प्रमुख पुस्तकांमध्ये 'ध्यानाभ्यासाद्वारे आंतरिक आणि बाह्य शांति' या पुस्तकाचा समावेश आहे. जो बार्न्स आणि नोबलच्या ध्यान-अभ्यास विषयावरील सर्वात जास्त विक्री झालेले पुस्तक आहे. संत राजिंदर सिंह जी महाराजांना विभिन्न देशांद्वारे अनेक शांति पुरस्कार व सन्मानपत्रे तसेच पाच डॉक्टरेटच्या पदव्यांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
सावन कृपाल रुहानी मिशन एक आध्यात्मिक ना नफा ना तोट्यावर चालणारी संस्था आहे. यांचे विश्वभरात 3,300 हून अधिक केंद्र आहेत आणि यांचे साहित्य जगातील 55 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. यांचे मुख्यालय- विजयनगर, दिल्ली येथे असून आंतरराष्ट्रीय मुख्यालय नेपरविले, अमेरिका येथे स्थित आहे.
आम्ही आपणास अनुरोध करतो की, संत राजिंदर सिंह जी महाराज यांच्या दोन दिवसीय सत्संग व नामदानाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास उपस्थित राहावे.
कार्यक्रमाचे स्वरूप : -
गुरुवार, दिनांक 12-10-2023 रात्रौ 8 वाजता-सत्संग
शुक्रवार दिनांक 13-10-2023 दोपारी 3 वाजता-दर्शन
संध्याकाळी 6 वाजता -सत्संग
रात्रौ 8 वाजता -नामदान (अनुग्रह)
स्थान : कॅन्टोन्मेंट ग्राउंड, आनंद रोड, देवळाली कॅम्प, जिल्हा नाशिक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत