Header Ads

Header ADS

भारती ज्वेलर्सच्या तिन्ही मालकांच्या त्रासाला कंटाळून अविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या रावेर पोलिसात गुन्हा दाखल

Three-owners-of-Bharti-jewellers-unmarried-young-unmarried-hanged


भारती ज्वेलर्सच्या तिन्ही मालकांच्या त्रासाला कंटाळून अविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या रावेर पोलिसात गुन्हा दाखल

लेवाजगत न्यूज रावेर -जळगाव जिल्ह्यातील रावेर येथिल भारती ज्वेलर्सच्या तिन्ही मालकांच्या त्रासाला कंटाळून अविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Three-owners-of-Bharti-jewellers-unmarried-young-unmarried-hanged




         याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यातील रावेर येथिल भारती ज्वेलर्सच्या तिन्ही दुकान मालकांच्या त्रासाला कंटाळून काम सोडल्याच्या कारणावरून तणावात येऊन रावेर शहरातील अविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने भारती ज्वेलर्सच्या तिन्ही मालकांविरुद्ध रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे कासार गल्लीतील रहिवाशी किशोर जैन वय 42वर्षे हा अविवाहित तरुण भारती ज्वेलर्स मध्ये काम करीत होता त्याने ज्वेलर्स च्या दुकानातील काम सोडले होते या कारणावरून भारती ज्वेलर्सचे मालक करण गणवानी,अनुराग गणवानी,महेश गणवानी हे तिन्ही जण दिनांक 22/10/2023ते 27/10/2023या दरम्यान किशोर जैन याला वेळोवेळी मोबाईलवर व तसेच दुसऱ्या कामाच्या ठिकाणी जाऊन आमच्या दुकानामध्ये कामाला ये नाहीतर तुझ्यावर चोरी केल्याचा आरोप करून तुझि समाजात बदनामी करू व तुला कुठेही काम मिळू देणार नाही व किशोर जैन याला घराजवळ येऊन मारहाण केली.त्यामुळे भारती ज्वेलर्सच्या तिन्ही मालकांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून किशोर जैन याने घराच्या छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबत मयताची आई रत्नाबाई बाबुराव सैतवाल यांच्या फिर्यादीवरून भारती ज्वेलर्सच्या तिन्ही मालकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले पोलीस कॉन्स्टेबल संभाजी बिजागरे हे करीत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.