Header Ads

Header ADS

समाजऋण फेडण्यासाठी कृतज्ञता महत्वाची-ज्येष्ठ समाजसेवक-डॉक्टर रवींद्र भोळे

 

Social Debt-to-Pay-Gratitude-Important-Senior-Social-Servant-Dr-Ravindra-Bhole

समाजऋण फेडण्यासाठी कृतज्ञता महत्वाची-ज्येष्ठ समाजसेवक-डॉक्टर रवींद्र भोळे

लेवाजगत न्यूज उरुळी कांचन: मनुष्य जन्माला आल्यापासून अनेक रुग्णांनी ग्रासलेला असतो . प्रत्येकाने समाज रुग्ण फेडण्यासाठी तत्पर असले पाहिजे. समाजामुळे प्रगतीपथावर येऊन कृतकृत्य झालो अशी भावना होऊन कृतज्ञता व्यक्त करावी. कृतज्ञता व्यक्त होणे हे चांगुलपणाचे स्तोत्र असुन यातूनच सामाजिक कार्य घडते. समाजऋण फेडण्यासाठी कृतज्ञता महत्त्वाची असते असे मत जेष्ठ समाजसेवक डॉक्टर रवींद्र भोळे यांनी व्यक्त केले. 

Social Debt-to-Pay-Gratitude-Important-Senior-Social-Servant-Dr-Ravindra-Bhole


   सरस्वती प्राथमिक शाळा येथे टीव्ही एलईडी डिजिटल सेटचे श्रीमती रूकसाना आसिफ आत्तार यांचे वतीने विद्यार्थ्यांसाठी भेट देण्यात आली. याप्रसंगी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुढे प्रमुख पाहुणे  म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. रवींद्र भोळे म्हणाले की श्रीमती रुकसाना आत्तार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ग्रामीण भागात शिक्षण घेऊन बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी पद मिळवले. मात्र सामाजिक बांधिलकीची जाण व भान ठेवून त्यांनी आज  शाळेमध्ये, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण मिळावे म्हणून जो डिजिटल सेट एलईडी टीव्ही भेट दिला हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे. 


        त्यामुळे श्रीमती आत्तार मॅडम यांची समाजाविषयीची कृतज्ञता व्यक्त होते. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर रवींद्र भोळे व शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय कुंजीर यांचे हस्ते सौ आत्तार मॅडम यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय कुंजीर, हेमलता काळे महिला दक्षता समिती अध्यक्ष, सहजान आतार वार्ताहार सोलापूर, शिक्षकवर्ग, संजय कुंजीर, किरण तळले, अमोल कुंजीर,सौ मनीषा मेमाणे कुमारी लीना धिवार , सौ स्मिता तोडकरी ,सौलता यादव व पालक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.