Header Ads

Header ADS

शिंदीतील जि.प. शाळेची बैलगाडीतून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्रभेट सहल


 शिंदीतील जि.प. शाळेची बैलगाडीतून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्रभेट सहल

लेवाजगत न्युज शिंदी:- जि.प.शाळा शिंदी ता.भुसावळ,जि.जळगांव यांच्या शिंदी शाळेची बैलगाडीमधून विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट सहल काढण्यात आली.


श्रेत्रभेट सहलीमध्ये गावाला लागून असलेल्या खोरीचा तलाव,शेती,शेतीस पूरक व्यवसाय यांना भेटी देण्यात आल्या.


 विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आणि शेतकरी बांधवांच्या मदतीने सात बैलगाडीमधून क्षेत्र भेट सहल काढण्यात आली.


शैक्षणिक क्षेत्रभेटी सहली दरम्यान विद्यार्थ्यांना शेती, शेतीची कामे, शेतीची अवजारे, शेतीची आधुनिक अवजारे, पिकांचे प्रकार, पिकांना पाणी देण्याच्या पद्धती, पाणी देण्याच्या आधुनिक पद्धती, पाण्याचे स्त्रोत, शेती पूरक व्यवसाय यांची माहिती विद्यार्थ्यांना  देण्यात आली.


१)खोरी तलाव:-तलाव साधारण १९९० ते १९९२ च्या दरम्यान बांधला. 

तलावाचा फायदा आजूबाजूला लागून असलेल्या शेतीला झाला.आज तलावा शेजारील प्रत्येक शेतामध्ये विहीरी खोदलेल्या असून विहिरीला पाणी ८ ते १० महिने पाणी असते.त्यावर शेतकरी बांधव खरीप पिके,रब्बी पिके घेतात.  तलावामध्ये माशांचे बीज सोडलेले असून तलावाचा लिलाव करून परिसरात मासे विक्रीचा पूरक व्यवसाय केला जातो. अशा प्रकारे खोरी तलावाचा फायदा शेतकरी वर्गाला झालेला दिसून येतो. 


२)शेती:-  भारत कृषी प्रधान देश आहे. भारतात 70 टक्के लोक शेती करतात. शेताला भेट देऊन विद्यार्थ्यांना पिकांचे प्रकार सांगण्यात आले.


अ)खरीप पिके :- (पावसाळी पिके) जुने ते सप्टेंबर या चार महिन्याच्या पावसाच्या पाण्यावर खरीपाची पिके घेतली जातात. जून ते जुलै पर्यंत पेरणी करून साधारण ऑक्टोबर ते डिसेंबर या  महिन्याच्या दरम्यान पिकांची काढणी केली जाते. 

कापूस,ज्वारी,बाजरी, भात, तांदूळ, भुईमूग, उडीद, मूग, चवळी, तीळ, सोयाबीन ही खरीप पिके आहेत.


ब)रब्बी पिके:- (हिवाळी पिके) हिवाळयाच्या हंगामात ऑक्टोबर ते जानेवारी पर्यंत ही पिके घेतली जातात. म्हणून या पिकांना रब्बी पिके म्हटली जातात. या पिकांना उबदार आणि थंड वातावरण आवश्यक असते. गहू, हरभरा, करडई, मोहरी, बडीशेप,वगैरे ही रब्बी पिके आहेत.


क)उन्हाळी पिके:- मार्च ते जून या महिन्याच्या दरम्यान ही पिके घेतली जातात. या पिकांना गरम, कोरडे हवामान आवश्यक असते.  टरबूज, काकडी, मिरची, भुईमूग वगैरे ही उन्हाळी पिके आहेत.


३)शेतीची कामे:- शेतीमध्ये पिकांचे उत्पादन योग्य होण्यासाठी शेतीची काही कामे करणे आवश्यक असतात. त्यामध्ये नांगरणी, वखरणी, पेरणी, निंदणी, फवारणी ,खते देणे, कापणी, मळणी, उफणणी, साठवण ही शेतीची कामे आहेत.


४)शेतीची अवजारे:-  नांगर, वखर, तिफण,कोळपे, कुदळ, टिकाव, फावडे, विळा, कोयता, खुरपे, टोपले,घमेले



५)शेतीची आधुनिक यंत्रे:- ट्रॅक्टर द्वारे नांगरणी, ट्रॅक्टर द्वारे फवारणी, ट्रॅक्टर द्वारे पिकांची काढणी,ट्रॅक्टर द्वारे पावर टिलर, ट्रॅक्टर द्वारे कुट्टी, ट्रॅक्टर द्वारे पेरणी.


६)पिकांना पाणी देण्याच्या पद्धती:- पिकांना पाणी देण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यामध्ये सरी पद्धत, आळे पद्धत, मोकाट पाणी पद्धत.


७)आधुनिक पद्धती:- ठिबक सिंचन, तुषार पद्धत.


८)पाण्याचे स्त्रोत:- पाणी सजीवांना जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. शेतीसाठी सुद्धा पाण्याची गरज असते. नदी, तलाव, विहिरी, ओढा, कुपनलिका या पाण्याच्या स्त्रोतांचा वापर शेतीसाठी केला जातो.


९)शेती पूरक व्यवसाय:- शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी नसते. त्यामुळे शेतीला पूरक म्हणून जे व्यवसाय केले जातात, त्यांना शेतीपूरक व्यवसाय असे म्हणतात. शेळीपालन, कुक्कुट पालन, दुग्ध व्यवसाय,पशु पालन,मस्त्य पालन


याप्रमाणे विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीदरम्यान माहिती देण्यात आली.


 बैलगाडी साठी मदत करणाऱ्या बांधवांचे आम्ही आभारी आहोत. 

१)वीरेंद्र कोल्हे 

२)सुरेश परदेशी 

३)वैभव महाजन 

४)जितेंद्र पवार 

५)विद्याधर नेहेते  

६)दीपक सपकाळे

७)विजय राजपूत

८)विलास रमेश पाटील, 

बन्सीलाल पाटील,कांचन परदेशी,विक्रमसिंग चव्हाण,चारुलता कोल्हे या शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी सहकार्य केले.


 शैक्षणिक क्षेत्र भेट सहलीसाठी शाळेचे मुख्याध्यापक भगवान बडगुजर,उपशिक्षक समाधान जाधव, उपशिक्षिका प्रीती फेगडे, मीनाक्षी पाटील यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.