Header Ads

Header ADS

सावदा बस स्थानकात हिरकणी कक्ष नसल्याने महिलांची कुचंबणा ,हिरवे गवत उगवल्याने प्रवाशांचा जीव मुठीत

 

Savda-Bus-Stand-Harkani-Due-to-no-room-women-crowding,-green-grass-growing-passengers-lives-in-hand

सावदा बस स्थानकात हिरकणी कक्ष  नसल्याने महिलांची कुचंबणा,

हिरवे गवत उगवल्याने प्रवाशांचा जीव मुठीत 

लेवा जगत न्यूज सावदा- येथून रावेर, बऱ्हाणपूर ,जळगाव, भुसावळ, पुणे, कल्याण ,छत्रपती संभाजी नगर ,सुरत,नाशिक अशा महत्त्वपूर्ण शहरांना प्रवासी घेऊन बस सकाळी पाच वाजे पासून ये जा करीत असतात. महिलांना ५० टक्के प्रवासी तिकिटात सूट सरकार कडून मिळाल्याने प्रवाशी  महिलांची संख्या वाढत आहे. प्रवाशांना त्रासदायक ठरणारे हिरवे गवत व महिलांसाठी हिरकणी कक्ष याची उपायोजना त्वरित करावी अशी मागणी ही वाढत आहे.



परंतु बस स्थानकाच्या समोरच काही  प्रवाशी वाट पाहत उत्तरे कडे उभे असतात त्या मोकळ्या जागेत २ ते तीन फूट उंच हिरवेगार गवत वाढल्याने प्रवाशांना तेथे जन जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे .काही वेळेस काही कीटक प्रवाशांच्या निदर्शनास आले असता प्रवाशी अचानक पळतात या मुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.तरी या भागात दुर्लक्ष न करता त्वरित साफ सफाई करावी.


हिरकणी कक्ष नसल्याने महिलांची कुचंबना


   प्रवासी महिलांची संख्या वाढल्याने स्तनदा पान करण्यासाठी हिरकणी कक्षाची ही येथे सोय नसल्याने महिलांना लाजिरवाणे वाटत आहे . महिलांची यामुळे कुचंबना होत आहे .रावेर  आगार प्रमुखांनी तत्काल याकडे लक्ष देऊन प्रवाशांच्या सोयीसाठी असलेले ब्रीदवाक्य लक्षात घेऊन प्रवाशांना त्रास होणारे हे हिरवेगार उगवलेले गवत व हिरकणी कक्ष याची लवकरात लवकर उपाययोजना करावी व प्रवाशांना समाधान होईल असे प्रयत्न करावे असे प्रवासी संघटनेकडून मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.