सावदे येथे पाय घसरून खदानीत पडल्याने चिमुकल्याचा बुडून मृत्यू
सावदे येथे पाय घसरून खदानीत पडल्याने चिमुकल्याचा बुडून मृत्यू
लेवाजगत न्यूज जळगाव - गावातील लहान मुलांसोबत पायी जात असतांना एका पाच वर्षाच्या चिमुकल्याचा पाय घसरून खदानीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील सावदे गावात घडली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी हंबरडा फोडला. रोहित विकास पठाण (वय-५) रा. सावदे ता.एरंडोल असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, विकास सुपडू पठाण हे आपल्या पत्नी मोनी व पाच वर्षाचा मुलगा रोहित वास्तव्याला आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी पठाण दाम्पत्य हे शेताच्या कामाला निघून गेले होते. त्यावेळी रोहित हा घरी एकटाच होता. दरम्यान दुपारी दीड वाजेच्या सुमारास गावातील काही लहान मुलांसोबत रोहित देखील गावानजीक असलेल्या खदानीजवळ खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी खेळत असतांना त्याचा पाय घसरल्याने तो खदानीच्या पाण्यात पडला. ही घटना घडल्यानंतर सोबत असलेल्या मुलांनी गावात एकच धाव घेतली व घडलेली हकीकत सांगितली. गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून काही पोहणाऱ्यांनी त्याला बाहेर काढून तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. रोहित हा एकुलता एक मुलगा असल्याने नातेवाईकांनी एकाच आक्रोश केला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत