Header Ads

Header ADS

सावदा पालिकेचा पाणीपुरवठा २६ पासून बंद राहण्याची शक्यता,नागरिकांनी साठा करून ठेवावा

 

Savada-municipality-water-supply-possible-to-be-closed-from-26,-citizens-should-store-

सावदा पालिकेचा पाणीपुरवठा २६ पासून बंद राहण्याची शक्यता,नागरिकांनी साठा करून ठेवावा 

लेवा जगत न्यूज सावदा -सावदा पालिकेने पाणी पुरवठा विभागामार्फत एक जाहीर निवेदन प्रसिद्ध केले आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी मांगलवाडी ते सावदा जलशुद्धीकरण केंद्रावर येणारी रॉ वॉटर मुख्य पाईप लाईन सावदा रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे लाईनच्या पुलाखाली काही प्रमाणात लिकेज झालेली आहे. 

Savada-municipality-water-supply-possible-to-be-closed-from-26,-citizens-should-store-





       ती लिकेज झालेली पाईपलाईन शोधण्यासाठी काटेरी झुडपे झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने अद्याप लिकेज कुठे आहे हे शोधण्यास विलंब होत आहे. सणासुदीचे दिवस असल्यामुळे पाईपलाईनचे काम दिनांक २६ऑक्टोबर २०२३ गुरुवार रोजी करायचे आहे .तरी उद्या मंगळवार दिनांक २४ रोजी सकाळच्या सत्रा मध्ये होणारा पाणीपुरवठा हा नागरिकांनी आपल्या गरजेनुसार साठा करून ठेवावा व दिनांक २५ ऑक्टोबर बुधवार सकाळच्या सत्रा मध्ये होणारा पाणीपुरवठा आपल्या गरजेनुसार पाणीसाठा करावा व पाण्याचा योग्य तो वापर करून पाण्याचा विपर्यास होणार नाही .याची काळजी घ्यावी व सावदा पालिकेस सहकार्य करावे असे निवेदनात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.