Header Ads

Header ADS

रावेर आगार प्रमुखाचा सावदा बस स्थानकासाठी अजब फतवा,प्रवासी हैराण



रावेर आगार प्रमुखाचा सावदा बस स्थानकासाठी अजब फतवा,प्रवासी हैराण 

सावदा प्रतिनिधी- येथील बसस्थानकावर दररोज रावेर येथून जळगाव, नाशिक, औरंगाबाद, पुणे, सुरत,कल्याण, चोपडा अशा बस व दोघा तालुक्यातील ग्रामीण भागात लालपरी बसने  प्रवासी ये जा करीत असतात.या बस स्थानकास परिसरातील भरपूर खेडे लागू असून अनेक प्रवाशी रिक्षाने ये जा करीत असतातत्यांना जड वस्तू उतर चढ करण्यासाठी सोयीच्या असलेल्या जागेवर बस येजा करण्याचा फतवा रावेर आगार प्रमुखांनी काढल्याने प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.पूर्वी ज्या प्रवेश द्वारातून बस ये जा करीत होत्या त्या मार्गावरून पूर्ववत कराव्या अशी मागणी प्रवाशी करीत आहे.



   यातच रावेर आधार प्रमुखाने किरकोळ  दुरुस्ती अभावी रावेर कडे येणाऱ्या व जाणाऱ्या  नियमित बस ये जा करण्याचा  मार्ग बदलवून जेथे ऑटो मधून प्रवासी बस स्थानकात जळ वस्तू घेउन बस स्थानकात येण्यासाठी सोयीचे होते त्या ठिकाणाहून बस काढत येणाऱ्या सोयीच्या उभाच असलेल्या प्रवासांना याचा त्रास दोन-तीन महिन्यापासून सहन करावा लागत आहे.  किरकोळ बस स्थानकाची दुरुस्ती पावसाळ्यात न करता हा नवीन फतवा काढल्याने प्रवासीयांना यामुळे बस स्थानकावर येणे जाण्यासाठी व प्रवासी चढण्यासाठी त्रास सहन कराव लागत आहे. तरी प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या बस स्थानकावर प्रवाशांची गैरसोय होत असल्याने किरकोळ दुरुस्ती अभावी प्रवाशांना  त्रास देण्याचा हा प्रकार थांबवावा असे प्रवाशांनी मधून मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.