Header Ads

Header ADS

पोलिस उपनिरीक्षकाने ऑनलाइन क्रिकेटमध्ये जिंकले दीड कोटी रुपये

Police-sub-inspector-won-one-and-a-half-crore-in-online-cricket


पोलिस उपनिरीक्षकाने ऑनलाइन क्रिकेटमध्ये जिंकले दीड कोटी रुपये 

लेवाजगत न्यूज पुणे-ऑनलाइन क्रिकेट गेममध्ये संघ बनवत पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाने ४९ रुपयांत दीड कोटी रुपये जिंकले. सोमनाथ झेंडे असे पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून ते पिंपरी-चिंचवड पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत.  सोमनाथ झेंडे हे मूळचे जेजुरीचे रहिवासी आहेत. यावेळी ते म्हणाले, की स्वप्न पूर्ण झालं. पण प्रत्येकाने जोखीम पत्करून खेळावं. मी पोलीस दलात कायम राहणार.

पोलिस उपनिरीक्षकाने ऑनलाइन क्रिकेटमध्ये जिंकले दीड कोटी रुपये


    त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्याचा संघ तयार केला होता. यातूनच त्यांनी दीड कोटीची कमाई केली आहे. गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून ते हा गेम खेळत असल्याचे त्यांनी सांगितले. झेंडे यांना लागलेल्या लॉटरीमुळे त्यांचे कुटुंबीय सध्या आनंदात आहेत.


ऑनलाइन गेम खेळताना सावध राहण्याचे आवाहन

        सध्या क्रिकेट विश्वचषक सुरू आहे. मात्र, याचा फायदा घेऊन अनेक सायबर चोरटे फसवणूक करत आहेत. त्यामुळे अनेकांची फसवणूक होत असल्याने असे गेम खेळताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या खेळाचे व्यसनही लागू शकते, असेही सांगण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.