Header Ads

Header ADS

परमेश्वराची कृपा,आपल्या शुभेच्छा व वाडवडिलांची पुण्याई असल्याने वेळेत उपचार,कोजागिरी पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा-आ.शिरीषदादा चौधरी

 

Paramēśvarācī-kr̥pā,-āpalyā-śubhēcchā-va- vāḍavaḍilān̄cī-puṇyā'ī-asalyānē-vēḷēta-upacāra,-kōjāgirī-parvācyā-hārdika-śubhēcchā-ā-śirīṣadādā-caudharī


Paramēśvarācī-kr̥pā,-āpalyā-śubhēcchā-va- vāḍavaḍilān̄cī-puṇyā'ī-asalyānē-vēḷēta-upacāra,-kōjāgirī-parvācyā-hārdika-śubhēcchā-ā-śirīṣadādā-caudharī

परमेश्वराची कृपा,आपल्या शुभेच्छा व वाडवडिलांची पुण्याई असल्याने वेळेत उपचार,कोजागिरी पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा-आ.शिरीषदादा चौधरी

लेवाजगत न्यूज सावदा-रावेर यावल विधानसभा मतदारसंघातील सर्व बंधुभगिनींना सस्नेह नमस्कार, आपल्या सर्वांना दसरा व कोजागिरी पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास प्रत्यक्ष भेटावे, शुभेच्छांची देवाण-घेवाण करावी अशी मनापासून इच्छा आहे पण प्रकृती ठिक नसल्याने उपचारासाठी मला मुंबईत राहावे लागते आहे. जुन महिन्यात एक अँजिओप्लास्टी झाली, कामाला लागलो, परदेशी जाऊन आलो. परमेश्वराची  कृपा, आपल्या शुभेच्छा व वाडवडिलांची पुण्याई असल्याने वेळेत उपचार झाले. पण गेले काही दिवस पुन्हा त्रास होऊ लागला व मला उपचारासाठी पुन्हा मुंबईला यावे लागले वैद्यकीय तपासण्या झाल्या, नेमके निदानही झाले व दि. १८ रोजी पुन्हा दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी होऊन तीन स्टेंट टाकावे लागले. आता काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुंबईत थांबावे लागले आहे. काही दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या सदिच्छा व वैद्यकीय उपचारांमुळे यातून लवकरच बरा होईन हा विश्वास वाटतो.. अशी परिस्थिती असली तरी मतदारसंघातील कामे मात्र थांबणार नाहीत. माझ्या गैरहजेरीत युवा कार्यकर्ता चि. धनंजय चौधरी हा मतदारसंघात फिरतो आहे, संपर्क करतो आहे, कामांचा पाठपुरावा करतो आहे. खिरोदा येथील आमदार कार्यालय, रावेर व यावल येथील संपर्क कार्यालय चालू आहेत. आपण तिथे संपर्क साधून आपली समस्या मांडू शकता. त्यात लक्ष घालून ती सोडवण्यासाठी पावले उचलली जातील याची ग्वाही देतो.

    आपल्या शुभेच्छांचे बळ मोठे आहे म्हणूनच या आजारातून लवकर बरा होऊन आपल्या व मतदारसंघातील कामांसाठी हजर राहू शकेल हा विश्वास वाटतो. तो माझा संपूर्ण कार्यकर्ता व मित्रपरिवार संपर्कात राहिल व आपल्या समस्यांचे निवारण करत राहील. धन्यवाद.

आपला स्नेहकांक्षी,

शिरीष चौधरी, आमदार- रावेर-यावल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.