पाकिस्तानी पत्रकारांना मिळाला भारताचा व्हिसा, भारत-पाक सामना कव्हर करण्यासाठी 60 जण येणार
पाकिस्तानी पत्रकारांना मिळाला भारताचा व्हिसा, भारत-पाक सामना कव्हर करण्यासाठी 60 जण येणार
लेवाजगत न्युज गुजरात:-एकदिवसीय विश्वचषकादरम्यान पाकिस्तान संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदाबादमध्ये (narendra modi stadium) होणार्या भारत आणि पाकिस्तान ( India Vs Pakistan ) यांच्यातील सामना कव्हर करण्यासाठी पाकिस्तानी पत्रकारांना भारताचा व्हिसा मिळाला आहे. RevSportz ने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी फक्त पाकिस्तान संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफलाच विश्वचषकासाठी भारताचा व्हिसा मिळाला होता. मात्र आता पत्रकारांनाही व्हिसा मिळाला आहे.
RevSportz च्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे 60 पेक्षा जास्त पत्रकार भारत आणि पाकिस्तान सामना कव्हर करण्यासाठी व्हिसा मिळाला आहे. ते अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर ((narendra modi stadium)) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कव्हर करण्यासाठी येणार आहेत.
पीसीसीबी अध्यक्ष भारतात येणार -
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी पीसीबीचे अध्यक्ष भारतात येमार आहे. 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये महामुकाबला होणार आहे. त्यासाठी पीसीबीचे अध्यक्ष अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. मागील सात वर्षानंतर पहिल्यांदाच पीसीबीचे अध्यक्ष भारत दौऱ्यावर येत आहेत.
पाकिस्तानची दमदार सुरुवात -
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेतील पहिले दोन सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही सामन्यात पाकिस्तानने विजयाची नोंद केली आहे. पहिला सामना नेदरलँड आणि दुसरा श्रीलंकेविरुद्ध खेळला गेला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने वनडे विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला होता. दोन विजयासह पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
विश्वचषकात पाकिस्तानचा खास विक्रम -
श्रीलंकाविरोधात पाकिस्तान संघासमोर 345 धावांचे लक्ष्य होते. पाकिस्तानने हे आव्हान 48.2 षटकांत 4 विकेट गमावून पूर्ण केलं. विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वाधिक धावांचा पाठलाग आहे. पाकिस्तानने हा विक्रम रचला आहे. याआधी हा विक्रम आयर्लंड संघाच्या नावावर होता, आयर्लंडने 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध 328 धावांचे लक्ष्य पूर्ण केलं होतं.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार ओपनिंग सेरेमनी -
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावेळी ओपनिंग सेरेमनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये लाइट शो, डान्स परफॉर्मेंस आणि प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह यांचा लाइव्ह परफॉर्मेंस होणार आहे. त्याशिवाय भारत पाकिस्तान सामन्यावेळी खास सेलिब्रेटिंनाही आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यासारख्या दिग्गज नावांचा समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत