'एक तारीख, एक तास, आपला परिसर बनवू खास'; पंतप्रधान मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद
'एक तारीख, एक तास, आपला परिसर बनवू खास'; पंतप्रधान मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वच्छतेसाठी 'एक तारीख, एक तास' या रविवारी १ ऑक्टोबर रोजी राबवण्यात आलेल्या उपक्रमात देशभरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन 'स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा' या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी देशात सर्वत्र नागरी तसेच ग्रामीण भागात हे अभियान न भूतो न भविष्यती असे यशस्वीपणे पार पाडले.
'एक तारीख एक तास' हा उपक्रम जोषात साजरा करण्यात आला. मुंबईमध्ये या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. दक्षिण मुंबईतील शिवडी विभागात जनहित सोसायटी येथील तरुण मुलांनी एकत्र येऊन इमारतीची गच्ची, प्रत्येक मजला आणि परिसर स्वच्छ करून केंद्र शासनाच्या आवाहनाला जणू प्रतिसादच दिला. या गृहनिर्माण संस्थेचे सचिव नितीन कोलगे यांनी मुलांना प्रोत्साहन दिले तर राहुल सांवत यांनी कार्यक्रमाची धुरा वाहिली.
'स्वच्छतेला संस्काराचे रुप द्या, स्वच्छता ही सवय आहे, आपल्याला स्वच्छतेची शिस्त अंगिकारायची आहे, त्याला संस्काराचे रूप द्यायचे आहे. हे अभियान शंभर टक्के यशस्वी करून देशात आपल्या महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळवून द्यायचे आहे. चला प्रत्येकाने आपला परिसर कचरा मुक्त करूया. स्वच्छ, सुंदर करूया. आरोग्य आणि समृद्धीला गवसणी घालूया. स्वच्छतेचा जागर करूया,” असे आवाहन नितीन कोलगे यांनी केले.
सदर उपक्रमामध्ये साहिल जाधव, आकाश पवार, आकाश कांबळे, अमेय साळुंखे , राजेंद्र सोळस्कर, राकेश राणे, अमर राणे, मयुरेश पडेलकर, रूनाल कांबळे, शशांक पडेलकर, शौर्य पडेलकर, गितेश कांबळे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत