महायोगोत्सव २०२३ साठी नागपूर येथे पाहणी दौरा
महायोगोत्सव २०२३ साठी नागपूर येथे पाहणी दौरा
नागपूर (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य निरीक्षक महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, मुंबई जिल्हाध्यक्ष संतोष खरटमोल यांनी राज्यस्तरीय महायोगोत्सव २०२३ नागपूर साठी नागपूर येथे जाऊन पाहणी दौरा केला.
यादरम्यान नागपूर टीमकडून प्रसाद कुलकर्णी आणि संतोष खरटमोल यांचे मोठया आनंदात स्वागत करण्यात आले. डॉ. हेडगेवार भवन येथे २८-२९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय महायोगोत्सवच्या कार्यक्रम स्थळी भेट देऊन त्याची पाहणी करण्यात आली. यात सभागृह व्यवस्था, गेस्ट रूम, सदस्य बैठक व्यवस्था, साधकांची दोन दिवस राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, मान्यवरांच्या व्याख्याअचे आयोजन कशाप्रकारे करता येईल याच्यावर चर्चा करण्यात आली. नागपूर टीमकडून होणाऱ्या महायोगोत्सव मधील कामाचा आढावा घेण्यात आला. राज्यस्तरीय महायोगोत्सव मधील प्रत्येक समितीच्या कामाची विभागणी करून देण्यात आली. प्रत्येक समितीच्या प्रमुखाला रीतसर मार्गदर्शन करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी आणि सदस्य हे अगदी जोमाने काम करीत आहेत, हे त्यांच्या कामाचा आढावा घेताना दिसून आले.
याप्रसंगी विभागीय अध्यक्ष विनायकजी बारापत्रे, राज्य महासचिव अमितजी मिश्रा, नागपूर जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमजी थोटे, स्थानिक नियोजन समिती अध्यक्षा लता होलगरे, कोषाध्यक्षा उषा हिंदोरीया, उपाध्यक्षा सुवर्णा पाल, मनोहर पाल, श्री. ढोबळे, श्री. जांभूळकर यांच्यासह पन्नासहून अधिक सदस्य उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत