Header Ads

Header ADS

करवा चौथ-संत राजिन्दर सिंह जी महाराज

 

Karwa-Chauth-Sant-Rajinder-Singh-ji-Maharaj

करवा चौथ-संत राजिन्दर सिंह जी महाराज

    करवा चौथ एक पवित्र सण आहे . या सणाला सौभाग्यवतीचा सण असे ही म्हणतात. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दिर्घायूसाठी आणि निरोगी जीवनासाठी उपवास करतात. हा उपवास फार कठीण असतो कारण हा निर्जल करावा लागतो, ज्यामध्ये काही ही खाऊ किंवा पिऊ नाही शकत. हा उपवास पहाटेच्या तारांच्या सावलीत करावा लागतो आणि रात्री चंद्राचे दर्शन घेऊन सोडावा लागतो. या दिवशी आपल्या हिंदू सौभाग्यवती स्त्रिया नटून थटून रात्री देवाच्या समोर वचन घेतात की त्या मन , वचन  आणि कर्मानी म्हणजे सर्वस्व आपल्या पतीला समर्पित करतील. 





इतिहास मधल्या कथांच्या आधारे हे लक्षात येते की करवा चौथचे काय फायदे आहेत ?भारतीय हिंदू स्त्रिया हा उपवास शुद्ध अंतःकरणाने करतात आणि प्राचीन काळापासून ही प्रथा चालत आलेली आहे .

आपण कधी विचार केला आहे का की ह्या उपवासाचा उद्देश्य काय आहे ? ह्या उपवासाचा सुद्धा इतर उपवासांप्रमाणे एक अध्यात्मिक महत्व आहे .आपल्या देशाच्या कणा-कणा मध्ये अध्यात्मिकता बसलेली आहे. आपले सगळे सण,उत्सव आणि उपवास स्वतःच्या आत्मविकासासाठीच बनवले होते आणि उपवास हे शेवटी मोक्ष आणि प्रभू प्राप्तीसाठीच ठेवले जात होते. परंतु वेळेनुसार सत्य गायब होऊन जाते आणि आपण फक्त ह्या रीती रिवाजांच्या बंधनात अडकलेले आहोत. परम संत कृपाल सिंह जी महाराज नेहमी सांगतात कि आपले जितके हे उपवास, सण,उत्सव आहेत ह्यांच्या मध्ये अध्यात्म रुजलेली आहे आणि हेच आपल्या प्रांताची विशेषतः आहे . ह्या सर्व रीती रिवाजांमध्ये काही ना काही अध्यात्मिक रहस्य दळलेले आहे. या आपण बघूया कि ह्या करवा चौथ मध्ये कोणते अध्यात्मिक रहस्य दळलेले आहे?

करवा चौथ पहाटेला चांदण्याच्या सावलीत ठेवला जातो आणि रात्री चंद्राचे दर्शन घेऊन हा उपवास पूर्ण केला जातो. खरं तर हे अशा दुराव्याचा प्रतीक आहे जे एका अध्यात्मिक धेय्यापासून दुसऱ्या अध्यात्मिक धेय्यापर्यंत घेऊन जाते. हा करवा चौथचा उपवास ताऱ्यापासून चंद्रापर्यंत म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांच्या मिलन ची एक अवस्था आहे. हा उपवास तेव्हाच फलदायी आहे जेव्हा आपण आपल्या अंतःकरणामध्ये तारे पाहतो आणि पूर्ण दिवस परमेश्वराच्या भक्तीमध्ये घालवतो. ध्यान साधना करतो आणि संध्याकाळी चंद्राचे दर्शन आपल्या अंतःकरणा मध्ये करून नंतर आपल्या प्रियकरचा चेहरा बघतो, जो आपल्या हृदयाचा चंद्र आहे . जे आपले गुरु आहेत त्यांचे दर्शन करतो. अशाप्रकारे करवा चौथचा उपवास साजरा केला पाहिजे. 

आता ह्या काळात असं होत की, आपल्या आई, विवाहित मुली तसेच बहिणी हे उपवास करतात. पण खरच त्या ह्या दिवशी परमेश्वराची आठवण करतात का? आपण हेच करतो की सकाळी उठलो, उपवास केला की नंतर मैत्रिणीकडे किंवा नातेवाईकांकडे गप्पा गोष्टी करायला जातो. वादविवाद करतो. त्या दिवशी टी.वी. पाहतो. दिवसा पिच्चर पाहतो.पण खरं तर ह्या दिवसाचा खरा उदेश्य होता कि दिवसभर देवाच्या आठवणीत व ध्यान करण्यात घालवायचा होता. पण आपण ह्याचा पालन नाही करत .आपल्याला फक्त एक संधी मिळते नवीन नवीन कपडे,दागिणे मिळवायची आणि संध्याकाळी एका रितीनुसार , उपवास सोडायचा आणि आपण समजतो की एवढ  केल की  आपल्याला लायसन्स मिळालाय कि एका वर्षा साठी आपला पतीचा आरोग्य सुदृढ राहील आणि व्यवसायात ,नोकरीत ,प्रगती होईल. अशाप्रकारे आपण ह्या उपवासाचा खरा उद्देश्य विसरून जातो.

आपल्याला हा संपूर्ण  दिवस सिनेमा, टी .वी . मध्ये वाया घालवायला नको , आपल्याला सकाळी ध्यान साधना मध्ये बसायला हवं, दिवसभर प्रभूच्या आठवणीत घालवावे आणि रात्री आपल्या गुरूच्या आशीर्वादाने आपल्या अंतःकरणात चंद्राचे दर्शन घ्यावे आणि मग त्यांचे नूरानी रूपाचे दर्शन करावे.हा जो बाहेरचा चंद्र आहे ,जो प्रत्येक रात्री दिसत सुद्धा नाही. पण जो आपल्या अंतःकरणातील चंद्र आहे ज्याला आपण नेहमी बघू शकतो, तो खरा चंद्र आहे. अंतःकरणातील चंद्र बघूनच आपण खरं तर ह्या करवा चौथचा वास्तविक लाभ मिळवू शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.