सावदा येथील महामार्गाची दुरूस्तीसाठी मंगळवारपासून पत्रकारांचे सार्वजनिक बांधकाम खाते व महामार्ग प्राधिकरण विरुद्ध अन्नत्याग आंदोलन
सावदा येथील महामार्गाची दुरूस्तीसाठी मंगळवारपासून पत्रकारांचे सार्वजनिक बांधकाम खाते व महामार्ग प्राधिकरण विरुद्ध अन्नत्याग आंदोलन
लेवाजगत न्यूज सावदा- बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठ खड्डे पडले आहे. या रस्त्यांची दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी ताप्ती सातपुडा जर्नालिष्ट फाऊंडेशन ने आंदोलने केले होते.
त्यानंतर सावदा येथील रेस्ट हाऊस मध्ये कोठारी शास्त्री भक्ती किशोर दासजी, रावेर मतदार संघाचे आमदार शिरीष दादा चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे ,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,कुशल जावळे,पिंटू धांडे ,रावेर तहसीलदार बंडू कापसे नायब तहसीलदार संजय ताडे ल बांधकाम खात्याचे व्ही के तायडे महामार्ग प्राधिकरणाचे चंदन गायकवाड ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाऊंडेशन चे पदाधिकारी यांचे उपस्थितीत बैठक झाली होती त्यात घेवून ५ ऑक्टोबर पर्यंत काम करण्याचे सांगण्यात आले होते.
तरी देखील सावदा हद्दीतील परंतु अंकलेश्वर या महामार्गावर बाबा मंदिरा जवळ व एलआयसी ऑफिस समोर असलेले मोठमोठे खड्डे व बस स्थानकापासून असलेल्या काँक्रीट रोडवर सोडलेल्या दुभाजकांमध्ये दुरुस्ती न झाल्याने याचे ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने मंगळवारी १७ ऑक्टोबर पासून अन्नत्याग उपोषणाला सुरूवात करण्यात येणार आहे. याबाबत आज शनिवार रोजी सकाळी सावदा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर फळे यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच सारंगिक बांधकाम खात्याचे महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता व तहसीलदार यांना सोशल मीडियाद्वारे आज सकाळी निवेदने त्यांच्या भ्रमणध्वनी वरून पाठवण्यात आले आहे.
त्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार ५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत आपण या महामार्गाची देखभाल दुरुस्ती व सावदा हद्दीमध्ये झालेल्या रस्त्याच्या दुभाजकाची दुरुस्ती न झाल्यास आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असे आम्ही तुम्हाला सुचित केले होते. त्या अनुषंगाने आपल्या खात्यामार्फत व ठेकेदारामार्फत कोणतीही उपाययोजना त्वरित होताना दिसत नसल्याने व होणारे काम चांगल्या प्रतीचे होत नसल्याने आम्ही ताप्ती सातपुडा जर्नलिस्टचे पदाधिकारी व सदस्य सावदा बस स्थानकासमोर मंगळवार दिनांक १७ रोजी सकाळी ११ वाजता सार्वजनिक बांधकाम खाते व महामार्ग प्राधिकरण यांच्याविरुद्ध अन्नत्याग उपोषणास बसणार आहे याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत