पत्रकार सुनिल ठाकुर जनरत्न प्रतिभा भूषण पुरस्काराने सन्मानित
पत्रकार सुनिल ठाकुर जनरत्न प्रतिभा भूषण पुरस्काराने सन्मानित
उरण (सुनिल ठाकूर )पत्रकार सुनिल ठाकुर यांची पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेऊन जनरत्न प्रतिभा भूषण पुरस्काराने नुकतेच महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेच्या विशेष सहकार्याने इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन व अमरदीप बालविकास फाऊंडेशन यांच्या वतीने साहित्य मंदिर,वाशी येथे नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या कार्यप्रतिमा सन्मान महासंमेलनात दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
सुनिल ठाकुर यांनी वृक्षारोपण, आदिवासी वाड्यावर मास्क व Sanitizer चे वाटप, पत्रकारिताच्या माध्यमातून नागरी समस्यांचे निराकरण, गरजुना मदत व सहकार्य करणे व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप इत्यादी कार्य त्यांनी केलेले आहे.
सदरहु पुरस्कार सोहळ्यास नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, श्रीमंत संभाजीराव जाधव, डॉ.अमजद खान पठाण, अँड रमेश राठोड, जीएसटी चे डेप्युटी कमिशनर यास्मिन मोलकर, वैजापूर चे तहसीलदार सुनील सावंत,संगीतकार दत्ता कोळी, उद्योजक अश्फाक मन्सुरी व गीता मृच्छला, संयोजक एन.डी.खान व सौ.सलमा खान उपस्थित होते.
उरण तालुक्यातील गावचे सुपुत्र सुनिल ठाकुर यांना जनरत्न प्रतिभा भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल समाजाच्या विविध स्तरातील लोकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत