Header Ads

Header ADS

धनुर्विद्या स्पर्धेमध्ये सावदा येथील जिज्ञासा भारंबेला रजतपदक राष्ट्रीय स्पर्धा खेळणार


 धनुर्विद्या स्पर्धेमध्ये सावदा येथील जिज्ञासा भारंबेला रजतपदक राष्ट्रीय स्पर्धा खेळणार


लेवाजगत न्यूज सावदा:- सीबीएसइ साउथ झोन धनुर्विद्या स्पर्धा दिनांक 24 ते 26 ऑक्टोबर 2023 दरम्यान चित्रकूट इंटरनॅशनल स्कूल अहमदनगर येथे संपन्न झाल्या  सदर स्पर्धेत डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सावदा ची विद्यार्थिनी जिज्ञासा प्रशांत भारंबे हिने धनुर्विद्या  रिकर्व प्रकारात उत्तम खेळ करत द्वितीय क्रमांक मिळवून सिल्वर मेडल प्राप्त केले.

  तसेच तिची डेहराडून उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सध्या ती प्रशिक्षक श्री अमर जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली धनुर्विद्येचा  नियमित सराव करत असते. तसेच तिला धनुर्विद्या खेळाडू निशांत राठोड, ओम कोळी यांचे वारंवार मोलाचे मार्गदर्शन मिळत असते. 

तिच्या यशासाठी गोदावरी फौंडेशन चे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील तसेच शाळेच्या प्राचार्या भारती महाजन, प्रशिक्षक अमर जाधव सर असलम सर, व वसीम सर  यांनी तिचे अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.