जामनेर रेल्वेस्थानकाला रेल्वे विभागाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट
जामनेर रेल्वेस्थानकाला रेल्वे विभागाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट
लेवाजगत न्यूज:- जामनेर रेल्वेस्थानकाला रेल्वे विभागाच्या दोन वरिष्ठ अधिकारी यांचेसह जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देऊन पाहणी केली. रेल्वेमार्गाचे श्रेणीवर्धन करण्यात आल्याने स्थानकाची जागा रेल्वेद्वारे विकसित करण्यात येणार आहे.
ग्रामविकास मंत्री ना श्री गिरीश महाजन यांचे सूचनेनुसार रेल्वेस्थानकाच्या जागेवर राज्य व केंद्र शासनाच्याद्वारे संयुक्त प्रकल्प राबवुन जामनेर तालुक्यासाठी मंजूर झालेले तालुका क्रीडा संकुल, ग्रंथालय, व्यापारी संकुल इ. प्रकल्पांचा डीपीआर तयार करणेबाबत चर्चा करण्यात आली.
सविस्तर प्रकल्प आराखडा तयार झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री ना श्री गिरीश महाजन, पालकमंत्री ,ना श्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर सादरीकरण करण्यात येईल.
तदनंतर प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी मा केंद्रीय रेल्वे मंत्री यांचेकडेस सादर करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत